हे वाचून तुम्हीही द्याल तापसीच्या हिमतीची दाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 16:40 IST2016-08-20T11:10:53+5:302016-08-20T16:40:53+5:30

तापसी पन्नू लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटात तिची भूमिका बरीच  बोल्ड असल्याचे कळते. ...

By reading this you will feel the warmth of Tapas! | हे वाचून तुम्हीही द्याल तापसीच्या हिमतीची दाद !

हे वाचून तुम्हीही द्याल तापसीच्या हिमतीची दाद !

पसी पन्नू लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटात तिची भूमिका बरीच  बोल्ड असल्याचे कळते. पण आज आम्ही तिच्या भूमिकेबद्दल नाही तर तिने दाखवलेल्या हिमतीबद्दल सांगणार आहोत. अलीकडे तापसीने छेडखानीची बळी ठरणाºया मुलीची मदत करीत तिला तिच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवले. होय, शूटींगच्या निमित्ताने तापसी दिल्लीत होती. गाडीतून जात असताना काही मुल एका मुलीची छेड काढत असल्याचे तपासीला दिसले. पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून मुले तिची छेड काढत होती. मग काय,मागचा पुढचा काहीही विचार न करता  तापसी त्या मुलीच्या मदतीला धावली. छेड काढणाºया मुलांकडे तिने अशा काही रागाने बघितले की, त्यांनी तिथून काढता पाय घेतला. यानंतर तापसीने पीडित मुलीला सुरक्षित तिच्या घरापर्यंत सोडले. विशेष म्हणजे आपली मदत करणारी एक मोठी अभिनेत्री आहे, हे त्या पीडित मुलीच्या गावीही नव्हते. पण त्यामुळे तापसीला काहीही फरक पडला नाही. संकटात सापडलेल्या एकट्या मुलीची मदत करण्याची हिंमत तिने दाखवली, हीच मोठी गोष्ट म्हणायला हवी. वेल डन तापसी!!

Web Title: By reading this you will feel the warmth of Tapas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.