​वाचा :‘मनमर्झियां’ लांबणीवर, पण का??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 22:27 IST2016-08-01T16:26:37+5:302016-08-01T22:27:21+5:30

आयुष्यमान खुराणा, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मनमर्झियां’ हा चित्रपट मोठा गाजावाजा करून फ्लोअरवर आला. ...

Read: 'Manmurziya' prolong, but why ?? | ​वाचा :‘मनमर्झियां’ लांबणीवर, पण का??

​वाचा :‘मनमर्झियां’ लांबणीवर, पण का??

ुष्यमान खुराणा, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मनमर्झियां’ हा चित्रपट मोठा गाजावाजा करून फ्लोअरवर आला. आनंद एल राय यांनी गतवर्षी आपल्या होम प्रॉडक्शनखाली या चित्रपटाची घोषणा केली होती. सर्वात आधी समीर शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. पण आनंद एल राय यांच्याशी होत असलेल्या मतभेदामुळे दिग्दर्शक समीर शर्मा यांना हा चित्रपट सोडावा लागला .मग समीर शर्मा यांच्या जागी ‘नील बटे सन्नाटा’ फेम दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्या हाती ‘मनमर्झियां’ सूत्रे सोपवण्याचा निर्णय झाला. अश्विनी अय्यर चित्रपट मार्गी लागणार त्याआधीच आनंद एल राय यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण म्हणजे आनंद एल राय यांचा स्वभाव. होय,सूत्रांच्या मते, आनंद एल राय यांच्या डोक्यात चित्रपटाबद्दलचे व्हिजन एकदम क्लिअर असते.  त्याबद्दल ते कुठलीही तडजोड स्वीकारत नाहीत. ‘मनमर्झियां’ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला, यामागे हेच कारण आहे. आनंद यांना अर्धा अधिक चित्रपट उत्तर भारतात हिवाळ्यातील वातावरणात शूट करायचा होता. मात्र तूर्तास उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळेच मनासारखे दृश्य नाहीत म्हणून ‘मनमर्झियां’ लांबवणीवर टाकण्यात आला आहे. याशिवाय आणखी दुसरे कारण म्हणजे, आनंद एल राय सध्या शाहरूखसोबतच्या एका चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत. तेव्हा केवळ याच चित्रपटावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याचा फटकाही ‘मनमर्झियां’ला बसला आहे...आता हा चित्रपट कधी मार्गी लागतो, ते बघूच!!
 

Web Title: Read: 'Manmurziya' prolong, but why ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.