हे वाचाच: जॉनची प्रामाणिक ‘कबुली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 20:47 IST2016-03-30T03:47:21+5:302016-03-29T20:47:21+5:30
हॉट अॅण्ड क्यूट जॉन अब्राहम म्हटले की, तरूणीच्या उड्या पडणारच. तसा जॉन तसा संकोची स्वभावाचा, लाजरा अभिनेता म्हणून ओळखला ...
.jpg)
हे वाचाच: जॉनची प्रामाणिक ‘कबुली’
मुली त्याच्यावर तुटून पडतात, हे मला अजिबात आवडत नाही, असेही तो म्हणाला. त्याने याबाबतचा एक किस्साही ऐकवला. त्याने सांगितले की,हॉलंडमध्ये पाच-सहा मुलींचा एक घोळका माझ्याजवळ आला. त्यांनी माझ्या टी-शर्टला हात लावला. बॉडीगार्ड होते पण त्यांनी मुलींना थांबवण्यास नकार दिला. त्यामुळे या मुली आणखीच जवळ आल्या. मला स्पर्श करू लागल्या. अचानक मला दाह जाणवला. बघतो तर स्किनवरच्या ओरखड्यातून रक्त येत होतं. मी त्या मुलींना म्हटलं, असं का करतायं. तर त्यातली एक मुलगी म्हणाली, मला तुझी स्कीन माझ्या नखात हवी आहे. मी अवाक् झालो.
जॉन इतका लाजरा का, याचे रहस्यही खुद्द जॉननेच सांगितले. तो म्हणाला, कॉलेजमध्ये असताना माझ्या चेहºयावर असंख्य पिंपल्स होते.मुलींनी माझ्याकडे बघितले की, माझ्या चेहºयावरील पिंपल्स आणखी मोठे झाल्याचा भास मला व्हायचा. त्यामुळे मी मुलींकडे पाहणे टाळायचोच आणि खाली बघायचो. आजही ही सवय गेलेली नाही. पण माझी हीच सवय आज मुलींना गोड वाटते.