रविना टंडनने अक्षयकुमारला रेखासोबत रोमान्स करताना पकडले होते रंगेहाथ; मग असे काहीसे घडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 18:34 IST2017-09-03T13:04:14+5:302017-09-03T18:34:14+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार सुरुवातीपासूनच त्याच्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेत आहे. अक्षयने बºयाचशा अभिनेत्रींसोबत रोमान्सचा खेळ खेळला. या खेळात अक्षयचे फारसे ...

Ravi Tandon had caught Akshay Kumar with romance while doing romance; Then something happened! | रविना टंडनने अक्षयकुमारला रेखासोबत रोमान्स करताना पकडले होते रंगेहाथ; मग असे काहीसे घडले!

रविना टंडनने अक्षयकुमारला रेखासोबत रोमान्स करताना पकडले होते रंगेहाथ; मग असे काहीसे घडले!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार सुरुवातीपासूनच त्याच्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेत आहे. अक्षयने बºयाचशा अभिनेत्रींसोबत रोमान्सचा खेळ खेळला. या खेळात अक्षयचे फारसे नुकसान झाले नाही, मात्र बºयाचशा अभिनेत्रींमध्ये यामुळे युद्ध पेटले होते, जे अजूनही सुरूच आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल खन्ना कधीकाळी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. परंतु अक्षयमुळे या दोघींमध्ये असे काही वैर निर्माण झाले जे अजूनही संपले नाही. त्याचबरोबर रविना टंडन आणि रेखा यांच्यातही असेच काहीसे वैर आहे, जे अजून संपलेले नाही. 

हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अक्षयकुमार त्याच्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाची शूटिंग करीत होता. त्याकाळी अक्षय आणि रविनाच्या अफेअरची बातमी सगळीकडे जोरदार पसरलेली होती. दोघे लवकरच लग्न करतील अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र दोघांच्या लग्नात रेखामुळे विघ्न आले. ज्या पद्धतीने चित्रपटात अक्षय रविनाला सोडून रेखाच्या प्रेमात पडतो तसेच काहीसे या तिघांच्या रिअल लाइफमध्ये घडले होते. एकीकडे रविना अक्षयला घेऊन खूपच सिरियस होती, तर अक्षय त्याच्या इतर अफेअर्सप्रमाणेच रविनासोबतच्या अफेअर्सलाही कॅज्युअली घेत होता. 



असे म्हटले जाते की, रविना आणि अक्षयमधील ब्रेकअपला रेखा जबाबदार आहेत. ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या सेटवर रेखा अक्षयकुमारसाठी जेवण घेऊन येत असत. त्याचबरोबर अक्षयला जवळ बोलावून मोठ्या प्रेमाने त्याला जेवण भरवीत असत. दोघांच्या या लीला रविनाचा मात्र पारा चढविणाºया असत. रविनाला रेखा अजिबातच आवडत नसत. रेखांनी अक्षयशी जवळीकता निर्माण करू नये यासाठी रविना वाट्टेल ते प्रयत्न करीत असे. त्यासाठी तिने अक्षय आणि रेखावर नजर ठेवण्यास सुरुवात केली.  

एक दिवस रविनाला जे बघायला नको होते, नेमके तेच तिला बघावयास मिळाले. होय, रेखा आणि अक्षय रोमान्स करताना रविनाने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी रविनाचा असा काही पारा चढला होता की, तिने अक्षयऐवजी रेखालाच खडेबोल सुनावले. तिने रेखाला जाहीरपणे शिविगाळ केली. त्यानंतर तिने अक्षयवर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र अक्षय रविनापासून दूर पळू लागला. अखेर दोघांचे ब्रेकअप झाले. 

Web Title: Ravi Tandon had caught Akshay Kumar with romance while doing romance; Then something happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.