निहलानी यांना रवीशंकर प्रसाद यांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 18:26 IST2016-06-10T12:56:02+5:302016-06-10T18:26:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चमच्यांची गरज नसल्याचे सांगून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांना ...

Ravi Shankar Prasad reprimanded Nihalani | निहलानी यांना रवीशंकर प्रसाद यांनी फटकारले

निहलानी यांना रवीशंकर प्रसाद यांनी फटकारले

तप्रधान नरेंद्र मोदी यांना चमच्यांची गरज नसल्याचे सांगून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांना फटकारले.
निहलानी यांनी काही दिवसांपूर्वी ‘अनुराग कश्यप यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चमचा आहोत. मला मोदी यांचा चमचा असल्याचा गर्व आहे.  इटलीच्या पंतप्रधानांचा मी चमचा होऊ काय?’ असे म्हटले होते. 
रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले, की अशा वक्तव्यांपासून दूर राहिले पाहिजे. आमचे पंतप्रधान स्वत:ला प्रधानसेवक म्हणून घेतात आणि मला वाटते प्रधानसेवकाला कोणत्याही चमच्याची गरज नाही.
पहलाज निहलानी यांना भाजपा समर्थक म्हणून ओळखले जाते. भाजपाच्या इशाºयावर  पहलाज निहलानी यांनी उडता पंजाब चित्रपटात अनेक कट सुचविले असल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला आहे. 

Web Title: Ravi Shankar Prasad reprimanded Nihalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.