Raveena Tondon ची धाकटी लेक दिसायला आहे खूपच ग्लॅमरस, सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:27 IST2022-01-20T17:10:15+5:302022-01-20T17:27:43+5:30
स्टारकिड्स काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना असते. यात अभिनेत्री रवीना टंडन(Raveena Tandon)च्या मुलीचा ही समावेश आहे.

Raveena Tondon ची धाकटी लेक दिसायला आहे खूपच ग्लॅमरस, सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर
सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टारकिड्सची धूम आहे.मोठ्या मुलांसोबतच लहान मुलांचेही फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात. त्यांचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत. स्टारकिड्स काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना असते. यात अभिनेत्री रवीना टंडन(Raveena Tandon)च्या मुलीचा ही समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. रवीनाने तिच्या आयुष्यातील स्टारडम पाहिले जे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. यासह रवीनानेही आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर दोन मुलींना दत्तक घेतले. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना मुलगी राशा आणि एक मुलगा आहे. आईप्रमाणे रवींच्या मुलीही दिसायला तितक्याच सुंदर आहे. रवीनाचा मुलगी राशा बॉलिवूड अभिनेत्रीही सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते.
राशा देखील आईप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. राशा आई रवीनाच्या खूप क्लोज आहे. बर्याचदा राशा रवीनासोबत फिरताना दिसते.. राशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे ग्लॅमरस फोटो यावर दिसतात. राशाचा जन्म 16 मार्च 2005 रोजी झाला आहे. 17 वर्षांची राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला 110K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.