‘तू चीज बडी हंै मस्त मस्त’ गाण्याच्या शूटिंगप्रसंगी रविना टंडन अचानक झाली होती बेशुद्ध, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 19:44 IST2017-09-30T14:14:50+5:302017-09-30T19:44:50+5:30

१९९४ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘तू चीज बही हैं मस्त मस्त’ हे गाणे अजूनही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. ...

Raveena Tandon was suddenly unconscious on the shooting of 'Tu Cheese Buddi Hani Mast Mast', but why? | ‘तू चीज बडी हंै मस्त मस्त’ गाण्याच्या शूटिंगप्रसंगी रविना टंडन अचानक झाली होती बेशुद्ध, पण का?

‘तू चीज बडी हंै मस्त मस्त’ गाण्याच्या शूटिंगप्रसंगी रविना टंडन अचानक झाली होती बेशुद्ध, पण का?

९४ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘तू चीज बही हैं मस्त मस्त’ हे गाणे अजूनही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. हे गाणेच नव्हे तर दमदार कथेच्या जोरावर हा चित्रपट अजूनही प्रेक्षक आवडीने बघतात. चित्रपटात अक्षयकुमार, रविना टंडन यांच्यासह सुनील शेट्टी, नसीरुद्दीन शाह, परेश रावल यांच्या दमदार भूमिका आहेत. त्याकाळी अक्षय आणि रविनावर चित्रित करण्यात आलेले ‘टीप टीप बरसा पाणी’ आणि ‘तू चीज बडी हैं मस्त-मस्त’ या दोन गाण्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती. त्याकाळी सर्वत्र या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या ओठावर असायचे. काही दिवसांपूर्वी ‘तू चीज बडी हंै मस्त मस्त’ या गाण्याचे नवे व्हर्जनही समोर आले. मात्र रविना आणि चित्रित केलेल्या या गाण्याची मजा काही औरच आहे. असो, या गाण्याबाबत रविनाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

होय, एका मुलाखतीत रविनाने सांगितले होते की, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्याची शूटिंग करताना मी अचानकच बेशुद्ध होऊन खाली पडली होती. वास्तविक रविना त्याकाळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. रविनाने कुठल्याही गॉड फादरविना इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. अर्थातच याकरिता तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. रविनाने सांगितले की, ‘जेव्हा मला या गाण्याची शूटिंग करण्यासाठी बोलाविण्यात आले, तेव्हा मी शिमला येथे कुठल्यातरी चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त होती. 



पुढे बोलताना रविनाने म्हटले की, मी फ्लाइटने तातडीने शिमला येथून मुंबईला पोहोचली. थंड वातावरणातून एकदमच मुंबईची गर्मीचा सामना करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. त्यामुळे याचा माझ्या प्रकृतीवर परिणाम होणे स्वाभाविक होते. अशातही मी सेटवर स्वत:ला तयार केले. मात्र जे व्हायचे तेच झाले. जेव्हा मी डान्स करीत होती, तेव्हा अचानकच बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ झाला. मला अचानक मेडिकल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. मी शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा शूटिंग केली. 

Web Title: Raveena Tandon was suddenly unconscious on the shooting of 'Tu Cheese Buddi Hani Mast Mast', but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.