लेकीसोबत ऋषिकेशला पोहोचली रवीना टंडन, गंगा आरतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:15 AM2023-11-09T09:15:28+5:302023-11-09T09:46:02+5:30

रवीनाचा गंगा आरती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Raveena tandon spotted rishikesh with daughter rasha thadani before diwali 2023 performed ganga aarti video viral | लेकीसोबत ऋषिकेशला पोहोचली रवीना टंडन, गंगा आरतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

लेकीसोबत ऋषिकेशला पोहोचली रवीना टंडन, गंगा आरतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

90 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमा देणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन (Raveena Tandon). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रविनाने एक काळ गाजवला. इतकंच नाही तर आजही तिच्या अभिनयाची, खासगी आयुष्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. रवीना सध्या उत्तराखंडच्या यात्रेवर आहे. ऋषिकेशमधील तिचा गंगा आरती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रवीना ऋषिकेशच्या परमार्थ निकेतन घाटावर अनेक पुजाऱ्यांसोबत उभी राहून आरती करताना दिसत आहे. रवीना टंडन लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. पूजेच्यावेळी रवीनाने कपाळावर टिळा देखील लावला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवीना डंटन मोठ्या श्रद्धेने भजन गात गंगेची आरती करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत लेक राशा थडानीसुद्धा दिसतेय. 

ऋषिकेशपूर्वी रवीना केदारनाथ देखील गेली होती. केदारनाथमध्ये देखील तिने पूजा अर्चना आणि  रुद्राभिषेक केला. राशा आणि तिचा केदारनाथ यात्रेतील फोटो देखील सोशल मीडियावर समोर आला होता. दिवाळीच्या आधी रवीना मुलीसोबत उत्तराखंडच्या यात्रेला गेली आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आईप्रमाणेच दिसायला सुंदर असलेली राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. अभिनेता रामचरणच्या (Ram charan) सिनेमातून राशा डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.राशा थडानी लवकरच तेलुगू सिनेमातून अभिनयाला सुरुवात करेल.. मात्र अद्याप या चर्चांवर अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ना राशाने आणि ना रामचरणने यावर काहीच शेअर केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अशाही चर्चा होत्या की राशा अजय देवगणची बहीण नीलमचा मुलगा अमन देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू करु शकते. अभिषेक कपूरच्या एक्शन एडव्हेंचर फिल्ममध्ये या दोघांची जोडी असण्याची शक्यता आहे. मात्र याबद्दलही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Raveena tandon spotted rishikesh with daughter rasha thadani before diwali 2023 performed ganga aarti video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.