पतीसोबत ‘या’ महिंलेला बघून संतापली रविना टंडन; शिवीगाळ करीत महिलेच्या अंगावर फेकला ग्लास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:18 IST2017-10-31T15:48:00+5:302017-10-31T21:18:00+5:30

नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज करणाºया अभिनेत्री रविना टंडन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आजही रविनाचा बोल्ड ...

Ravana Tandon gets angry after seeing 'this' woman with husband; Fractured Glass on the woman's thighs! | पतीसोबत ‘या’ महिंलेला बघून संतापली रविना टंडन; शिवीगाळ करीत महिलेच्या अंगावर फेकला ग्लास!

पतीसोबत ‘या’ महिंलेला बघून संतापली रविना टंडन; शिवीगाळ करीत महिलेच्या अंगावर फेकला ग्लास!

्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज करणाºया अभिनेत्री रविना टंडन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आजही रविनाचा बोल्ड अंदाज तिला नेहमीच चर्चेत ठेवतो. त्याचबरोबर रविना तिच्या लव्ह लाइफमुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. अक्षयकुमार, अजय देवगण यांच्यासोबतचे तिचे अफेअर बºयाचकाळ चर्चेत राहिले. त्यातही अजयसोबतचे तिच्या अफेअरच्या चर्चा आजही रंगविल्या जातात. अजयच्या आयुष्यात करिष्मा कपूरची एंट्री झाल्यानंतर रविना आणि अजयमध्ये दुरावा निर्माण झाला होता. असे म्हटले जाते की, त्यावेळी रविनाने अजयला प्रचंड शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर रविनाचे जेव्हा अक्षयसोबत अफेअर होते तेव्हाही तिने असाच काहीसा पराक्रम केला होता. होय, जेव्हा अक्षयकुमार आणि रेखा यांच्यात जवळिकता निर्माण झाली होती, तेव्हा करिनाने रेखाला चित्रपटाच्या सेटवरच शिवीगाळ केली होती. तिचा शिवीगाळ करण्याचा सिलसिला पुढेही सुरूच राहिला. जेव्हा २००६ मध्ये फरहान अख्तरच्या पार्टीत रविना तिच्या पतीसोबत पोहोचली होती, तेव्हा ती तिच्या पतीची एक्स वाइफ नताशा सिप्पी हिच्याशी भिडली होती. तिला सर्वांसमोर शिवीगाळ केली होती. 

२२ फेब्रुवारी २००४ मध्ये रविनाने अनिल थडानी यांच्याशी विवाह केला. अनिलचे अगोदरच लग्न झालेले होते. त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन रविनाशी विवाह केला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतर फरहान अख्तरच्या पार्टीत रविनाची भेट अनिलची पहिली पत्नी नताशा सिप्पी हिच्याशी झाली. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. पार्टीत जेव्हा अनिल एकटे होते, तेव्हा नताशा त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेली. मात्र हीच बाब रविनाला खटकली. तिने नताशाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रविना आणि एक्स वाइफ अशाप्रकारे जाहीरपणे वाद घालत असल्याचे बघून अनिलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रविना त्यांचे ऐकण्याच्या अजिबातच मन:स्थितीत नव्हती. 



पुढे हा वाद ऐवढा पेटला की, रविनाने नताशाच्या अंगावर ग्लास फेकून मारला होता. त्याचबरोबर तिला प्रचंड शिवीगाळही केली होती. खरं तर इंडस्ट्रीत रविनाला प्रचंड रागीट अभिनेत्री म्हणूनही ओळखले जाते. तिने बºयाचशा अभिनेत्यांबरोबर हुज्जत घातल्याचे तिचे किस्से आहेत. यातीलच तिचा हा एक किस्सा आहे. 

Web Title: Ravana Tandon gets angry after seeing 'this' woman with husband; Fractured Glass on the woman's thighs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.