'स्क्रू ढिला'मधून रश्मिका मंदानाचा पत्ता कट! टायगर श्रॉफसोबत 'ही' स्टारकिड करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:26 PM2023-01-03T16:26:09+5:302023-01-03T16:26:41+5:30

Screw Dheela : तरुणाईमध्ये चांगलाच पॉप्युलर असलेला टायगर श्रॉफ दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'स्क्रू ढिला' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Rashmika Mandana's address cut from 'Screw Dheela'! 'Hi' starkid will romance with Tiger Shroff | 'स्क्रू ढिला'मधून रश्मिका मंदानाचा पत्ता कट! टायगर श्रॉफसोबत 'ही' स्टारकिड करणार रोमान्स

'स्क्रू ढिला'मधून रश्मिका मंदानाचा पत्ता कट! टायगर श्रॉफसोबत 'ही' स्टारकिड करणार रोमान्स

googlenewsNext

बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ(Tiger Shroff)ने काही दिवसांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनशी हातमिळवणी केली. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी घोषणा केली होती की तो टायगर श्रॉफसोबत स्क्रू ढिला (Screw Dheela) नावाचा चित्रपट बनवणार आहे, जो एक मेगा अॅक्शन एंटरटेनर असेल. स्क्रू ढिला या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी करण जोहरने चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतल्याचे ऐकायला मिळाले. चित्रपट बंद होण्यामागचे कारण समोर आले नाही, त्यामुळे लोक हैराण झाले होते. टायगरचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. अशा परिस्थितीतही करण जोहरने स्क्रू ढिला चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेणे खूपच धक्कादायक होते.

लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर श्रॉफचा पेच सुटलेला नाही. दिग्दर्शक शशांक खेतान या चित्रपटावर सातत्याने काम करत असून लवकरच त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या ताज्या अहवालानुसार, शनाया कपूर स्क्रू ढिला या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. शनाया कपूर धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. शनाया कपूरकडे धर्मा प्रोडक्शनचा बेधडकही आहे, ज्यामध्ये ती दोन नवोदित कलाकारांसोबत दिसणार आहे.

स्क्रू ढिला या चित्रपटाच्या घोषणेच्या वेळी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात आले. रश्मिका मंदान्ना आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच या चित्रपटात काम करणार होते पण त्यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडा वेळ थांबावे लागेल असे दिसते. लेटेस्ट मीडियानुसार, शनाया कपूरने स्क्रू ढिला या चित्रपटातून रश्मिका मंदान्नाची जागा घेतली आहे. रश्मिका मंदान्नाला चित्रपटातून का वगळण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी मीडिया पोर्टलला सांगितले की धर्मा प्रॉडक्शन लवकरच स्क्रू ढिलाच्या स्टारकास्टची अधिकृत घोषणा करू शकते.

Web Title: Rashmika Mandana's address cut from 'Screw Dheela'! 'Hi' starkid will romance with Tiger Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.