रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच मुंबईत घेतलं स्वतःचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:54 IST2021-02-24T17:53:14+5:302021-02-24T17:54:05+5:30
रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच मुंबईत घेतलं स्वतःचं घर
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून ती आगामी प्रोजेक्ट्ससाठी हिंदी चित्रपटासाठी ती मुंबईचा दौरा करताना दिसते आहे. कामात अडचणी येऊ नये यासाठी आता रश्मिकाने मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला की, रश्मिका मंदाना मिशन मजनू आणि इतर बॉलिवूड प्रोजेक्ट्सच्या तयारीसाठी मुंबई आणि हैदराबाद अशी धावपळ करते आहे. आता तिने मुंबईत आपली जागा बनवली आहे जेणेकरून ती सहज राहू शकते.
सूत्रांनी पुढे सांगितले की, या घराला घरपण आणण्यासाठी रश्मिकाने हैदराबादमधील घरातून मुंबईतील नवीन घरासाठी काही छान गोष्टी घेऊन आली आहे. ती आधी हॉटेलमध्ये राहत होती पण आता तिला घरासोबत मुंबई शहर फार आवडू लागले आहे.
रश्मिका मिशन मजनू चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाशिवाय ती आणखी एका प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ज्याबद्दल अद्याप आणखी माहिती मिळालेली नाही.
सरीलेरू, नीकेवरू, गीता गोविंदम आणि डिअर कॉमरेडसोबत दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत उल्लेखनीय आणि अविस्मरणीय सादरीकरण केल्यानंतर आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.