अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:59 IST2021-01-06T17:57:13+5:302021-01-06T17:59:04+5:30

रश्मीने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 

Rashami Desai Reveals Casting Couch Ordeal At 16 | अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून...

अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून...

ठळक मुद्देरश्मी सांगते, मी आनंदात होते. पण तिथे पोहोचल्यावर, त्याठिकाणी त्याच्याशिवाय कुणीही नव्हते. साधा कॅमेराही नव्हता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून मला बेशुद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

रश्मी देसाईला उतरण या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती बिग बॉस या कार्यक्रमात झळकली. तिने भोजपूरी इंडस्ट्रीत देखील तिचे प्रस्थ निर्माणम केले आहे. रश्मीने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

 

एका ऑडिशनदरम्यान रश्मी कास्टिंग काऊचची शिकार झाली होती. तिनेच इंडस्ट्रीच्या या वाईट बाजूविषयी सांगितले आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला. तिने सांगितले की, मला आठवते, कास्टिंग काऊचमधून गेली नाहीस तर इंडस्ट्रीत काम मिळणे बंद होईल,असे त्याने मला सांगितले होते. त्याचे नाव सूरज होते. तो आता कुठे आहे, मला ठाऊक नाही. पण मी पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हा त्याने मला माझ्या फिगरबद्दल विचारले होते. त्या स्टॅटिस्टिक्सचा अर्थही मला माहीत नव्हता. माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारा, माझ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणारा तो पहिला माणूस होता. एके दिवशी त्याने मला ऑडिशनसाठी बोलावले.

पुढे रश्मी सांगते, मी आनंदात होते. पण तिथे पोहोचल्यावर, त्याठिकाणी त्याच्याशिवाय कुणीही नव्हते. साधा कॅमेराही नव्हता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून मला बेशुद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मला हे काही करायचे नाही, हे मी सतत त्याला सांगत होते. दोन-अडीच तासानंतर मी तिथून बाहेर आले आणि घरी पोहोचल्यावर आईला सर्व सांगितले.

माझ्या आईने त्याला फोन करून रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवले. दुसऱ्या दिवशी आई त्याला भेटायला गेली आणि माझ्या आईने सर्वांसमोर त्याच्या थोबाडीत लगावली. माझ्या मुलीसोबत पुन्हा असे काही करण्याची हिंमत करू नकोस. मी तुला सोडणार नाही, अशी तंबीच तिने त्याला दिली होती.’

Web Title: Rashami Desai Reveals Casting Couch Ordeal At 16