कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:04 IST2017-08-01T08:14:23+5:302017-08-01T14:04:28+5:30

भारताला 1983 मध्ये वेस्टइंडिजला हरवून कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्डकप मिळवून दिला होता. कपिल देव यांच्या ...

Ranvir Singh to play Kapil Dev's role? | कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग?

कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग?

रताला 1983 मध्ये वेस्टइंडिजला हरवून कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्डकप मिळवून दिला होता. कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात येतो आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार हे नक्की आहे मात्र यात कपिल देव यांची भूमिका कोण साकारणार हे अजून ठरलेले नाही. रणवीर सिंगचे नाव चर्चेत आहे.याबाबत रणवीर विचारले असता त्यांनी यावर न बोलणेच पसंत केले. रणवीरला कपिल देव यांच्या भूमिकेत बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. याआधी रणवीरने कधीच बायोपिकमध्ये काम केले नाही. बाजीराव मस्तानी आणि पद्मावतीसारख्या चित्रपट केल्यानंतर रणवीरसाठी हा अनुभव खूप असणार आहे. रणवीरसोबत अर्जुन कपूरच्या नावाचा ही या भूमिकेसाठी विचार सुरु आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित मुबारकाँ चित्रपटात अर्जुन कपूर दिसला होता. या चित्रपटातून पहिल्यांदाच काका-पुतण्याची जोडी स्क्रिनवर झळकली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर, अनिल कपूर यांच्यासह इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. मुबारकाँमध्ये अर्जुन कपूराचा डबल रोल आहे. याचित्रपटाची कथा करण आणि चरण या दोघा जुळ्या भावांभोवती फिरणारी आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. तर रणवीर कपूर सध्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अल्लाउद्दीन खिलाजाच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे तर रवल रतन सिंग याच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे तर दीपिका पादुकोण यात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे. 17 नोव्हेंबर 2017ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या रणवीर दीपिका यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Ranvir Singh to play Kapil Dev's role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.