रणवीर सिंग जेंव्हा गोलमाल अगेनच्या सेटवर जातो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:55 IST2017-03-21T13:25:54+5:302017-03-21T18:55:54+5:30

अभिनेता रणवीर सिंग याने गोलमाल अगेनच्या सेटवर जाऊन अजय देवगन आणि रोहित शेट्टी यांची भेट घेतली. रणवीर सिंग हा ...

Ranvir Singh goes to the set of Golmaal again. | रणवीर सिंग जेंव्हा गोलमाल अगेनच्या सेटवर जातो....

रणवीर सिंग जेंव्हा गोलमाल अगेनच्या सेटवर जातो....

िनेता रणवीर सिंग याने गोलमाल अगेनच्या सेटवर जाऊन अजय देवगन आणि रोहित शेट्टी यांची भेट घेतली.
रणवीर सिंग हा संजय लीला भन्साली यांच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यातून वेळ काढत रणवीर सिंग याने गोलमाल अगेनच्या सेटवर भेट दिली. या संदर्भातील फोटो ट्विटरवर शेअर झाला आहे. गोलमाल अगेनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे. याला फोटो ओळही देण्यात आली आहे. ‘पहा गोलमाल अगेनच्या सेटवर कोण आलंय?’
 


एका स्टुडिओमध्ये रणवीर सिंग शूटिंग करीत असताना त्याला कळाले की, याच स्टुडिओमध्ये अजय देवगन आणि रोहित शेट्टी हे देखील आलेले आहेत. त्यानंतर त्याने भेट दिली. त्याशिवाय अर्धा तास गप्पाही मारल्या.
गोलमाल अगेन हा गोलमालच्या सिरीजमधील चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगन, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांचा समावेश आहे. त्याशिवाय तब्बू, परिणीती चोप्रा आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत.

 

Web Title: Ranvir Singh goes to the set of Golmaal again.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.