रणवीर म्हणतोय,‘मेरीवाली’ सर्वांत योग्य महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 11:48 IST2016-05-04T06:18:09+5:302016-05-04T11:48:09+5:30

 रणवीर सिंग सध्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ५० सर्वांत योग्य व्यक्तींच्या लिस्टमध्ये त्याचे नाव सर्वांत ...

Ranvir says, 'Meriwali' is the most suitable woman! | रणवीर म्हणतोय,‘मेरीवाली’ सर्वांत योग्य महिला !

रणवीर म्हणतोय,‘मेरीवाली’ सर्वांत योग्य महिला !

 
णवीर सिंग सध्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ५० सर्वांत योग्य व्यक्तींच्या लिस्टमध्ये त्याचे नाव सर्वांत अग्रक्रमावर आहे. मात्र, त्याने स्वत:सोबतच त्याची ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’  कोण  हे देखील सांगितले.

तो म्हणाला,‘ मला ज्यावेळी कोणी म्हणतं की, ‘हाये कितना हॉट है’ तेव्हा माझ्या मनात आनंदाने उकळ्या उठतात. एखाद्यामध्ये असलेली प्रामाणिकता, बुद्धिमत्ता यांच्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. मला रंग आणि प्रिंट आवडतात. पण, व्यक्ती फक्त काळा, पांढरा आणि ग्रे या तीनच रंगांमध्ये अडकू न पडतो. माझी ड्रेसिंग ही माझ्या मुडवर अवलंबून असते.

माझी स्टाईल माझ्या भावनांवर आधारित असते. माझ्यासाठी योग्य महिला ती असेल जिला संगीत आवडेल, चित्रपट आणि खेळ जिला आवडतील. अब बोलुंगा तो बोलेंगे की बोलता है. मोस्ट डिझायरेबल मॅन के पास, मोस्ट डिझायरेबल वुमन ही होगी. समझदार को इशारा ही काफी है. वेल, आॅल आय कॅन से इज....मेरीवाली.’ 

Web Title: Ranvir says, 'Meriwali' is the most suitable woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.