रणविजय सिंघाने घेतली सनी लिओनीच्या जुळया मुलांची भेट! तुम्हीही पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 12:26 IST2018-04-29T06:56:03+5:302018-04-29T12:26:03+5:30

एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला, रोडीज यासारख्या रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग करून रणविजय सिंघाने ओळख मिळवली. या रिअ‍ॅलिटी शोंच्यावेळी पॉर्न स्टार अभिनेत्री सनी ...

Ranvijay Singh took Sunny Leone's matching children! You see also photo ... | रणविजय सिंघाने घेतली सनी लिओनीच्या जुळया मुलांची भेट! तुम्हीही पाहा फोटो...

रणविजय सिंघाने घेतली सनी लिओनीच्या जुळया मुलांची भेट! तुम्हीही पाहा फोटो...

टीव्ही स्प्लिट्सव्हिला, रोडीज यासारख्या रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग करून रणविजय सिंघाने ओळख मिळवली. या रिअ‍ॅलिटी शोंच्यावेळी पॉर्न स्टार अभिनेत्री सनी लिओनी हिेने देखील त्याच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे रणविजय सिंघा आणि सनी लिओनी यांची घट्ट मैत्री असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याशिवाय त्यांनी अनेक मुलाखतींदरम्यानही त्यांना एकमेकांसोबत काम करायला आवडते हे बोलून दाखवले आहे. 



अलीकडेच रणविजय सिंघाने सनी लिओनीच्या दोन्ही जुळया मुलांची भेट घेतली. त्याने त्याच्या दोन्ही हातांवर या दोन बाळांना घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशार सिंग वेबर, नूह सिंग वेबर हे त्याच्या हातावर शांत झोपल्याचे या फोटोत दिसून येत आहे. या फोटोला सोशल मीडियावर अनेक लाइक्स मिळत आहेत. युजर्सनी या फोटोला कमेंटसही दिल्या आहेत. 



निशा व्यतिरिक्त सनी आणि डॅनियलला दोन जुळी मुलेही आहेत. मार्च २०१८ मध्ये सनीने याबाबतची घोषणा केली होती की, डेनियल जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. ही गोड बातमी सांगताना सनीने लिहिले होते की, २१ जून २०१७ हा दिवस होता. जेव्हा डेनियल आणि मला कळाले की, आमची तीन मुले असतील. आम्ही प्लॅन केला आणि फॅमिली बनविण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्षांनंतर अशार सिंग वेबर, नूह सिंग वेबर आणि निशा कौर वेबर यांच्यासह आमची फॅमिली कम्प्लीट झाली आहे. आमच्या मुलांचा जन्म काही आठवड्यांपूर्वीच झाला. 

 

Web Title: Ranvijay Singh took Sunny Leone's matching children! You see also photo ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.