रणवीरचा ‘बेफिक्रे’ पडणार ‘पद्मावती’वर भारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 21:31 IST2016-08-10T15:08:00+5:302016-08-10T21:31:26+5:30
रणवीर सिंह व वाणी कपूर या दोघांना तुम्ही किस्सीविस्सी करताना पाहिलेच. अहो, आम्ही बोलतोयं ते,‘बेफिक्रे’च्या ‘हॉट’ पोस्टर्सविषयी. कालच ‘बेफिक्रे’चे ...
.jpg)
रणवीरचा ‘बेफिक्रे’ पडणार ‘पद्मावती’वर भारी!!
र वीर सिंह व वाणी कपूर या दोघांना तुम्ही किस्सीविस्सी करताना पाहिलेच. अहो, आम्ही बोलतोयं ते,‘बेफिक्रे’च्या ‘हॉट’ पोस्टर्सविषयी. कालच ‘बेफिक्रे’चे नवे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवर रणवीर एका बीचवर वाणीसोबत फ्रेंच लिप लॉक करताना दिसतोय. यापूवीर्ही ‘बेफिक्रे’चे काही हॉट पोस्टर्स तुम्ही पाहिलेच. त्यामुळेच सध्या तरी रणवीरचे चाहते ‘बेफिक्रे’ची सर्वाधिक आतूरतेने प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळेच ‘पद्मावती’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटापेक्षाही ‘बेफिक्रे’ रणवीरसाठी महत्त्वपूर्ण ठरेल,असेच मानले जात आहे. खरे तर असे वाटायला आधारही आहे. एकतर ‘बेफिक्रे’मध्ये रणवीरने नव्या पिढीतील ‘लव्हर बॉय’ रंगवलाय. दुसरे म्हणजे यातील रणवीर आणि वाणी यांच्यातील तब्बल 24 किस आणि काही इंटीमेट सीन्सने प्रेक्षकांची उत्सूकता कमालीची ताणली गेली आहे. केवळ एवढेच नाही तर रणवीर व वाणीची केमिस्ट्रीही अफलातून जमलीय. एकंदर रणवीर प्रथमच इतक्या हॉट अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. याऊलट ‘पद्मावती’ एक पिरियड ड्रामा आहे. रणवीरला आधीही ‘बाजीराव मस्तानी’ या पिरियड ड्रामात प्रेक्षकांना पाहिलेले आहे. शिवाय रणवीर व दीपिकाची जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांसाठी आता जुनी झाली आहे. रणवीरचा नव्या अभिनेत्रीसोबतचा रोमान्स पाहण्यात प्रेक्षकांना अधिक इंटरेस्ट वाटणे त्यामुळेच साहजिक आहे. कदाचित याचमुळे ‘बेफिक्रे’ हा ‘पद्मावती’वर भारी पडणार असे दिसतेय. पुढे काय होते, ते बघूच!!
![]()