​‘एक्सएक्सएक्स’च्या पार्टीत रणवीर-दीपिकावर खिळल्या सर्वांच्या नजरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 16:03 IST2017-01-13T16:03:35+5:302017-01-13T16:03:35+5:30

दीपिका पादुकोण हिचा पहिलावहिला हॉलिवूडपट ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ उद्या शनिवारी भारतात प्रदर्शित होतो आहे. काल रात्री ...

Ranveer at the XXX party, Deepika eyes all! | ​‘एक्सएक्सएक्स’च्या पार्टीत रणवीर-दीपिकावर खिळल्या सर्वांच्या नजरा!

​‘एक्सएक्सएक्स’च्या पार्टीत रणवीर-दीपिकावर खिळल्या सर्वांच्या नजरा!

पिका पादुकोण हिचा पहिलावहिला हॉलिवूडपट ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ उद्या शनिवारी भारतात प्रदर्शित होतो आहे. काल रात्री या चित्रपटाचा मुंबईत धमाकेदार प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी हॉलिवूडचा सुपरस्टार विन डिझेल स्वत: हजर होता. या प्रीमिअरवेळी विन डिझेल व दीपिका सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र होते, यात वाद नाही. पण केवळ विन व दीपिकाच नाही तर आणखी एक जोडी या प्रीमिअरच्या केंद्रस्थानी होती. ही जोडी म्हणजे, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांची. होय, दीपिकाचा कथित बॉयफे्रन्ड रणवीर सिंह या प्रीमिअरला आला आणि येताच सगळ्यांचे लक्ष त्याने वेधून घेतले.



प्रीमिअरनंतर साहजिक रंगली ती पार्टी. या पार्टीतही रणवीर आणि दीपिका या दोघांवरच सगळ्यांच्या नजरा खिळल्या. दीपिका आणि रणवीरने या पार्टीत अतिशय स्टाईलिश एन्ट्री घेतली. शॉर्ट रेड ड्रेसमधील दीपिका आणि ब्लॅक सूटमधील रणवीर या हॉट कपलची एन्ट्री होताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. दीपिकाच्या हॉलिवूड डेब्यूचा आनंद रणवीरच्या चेहºयावर स्पष्टपणे जाणवत होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे रणवीर यावेळी म्हणाला, ते याचमुळे.


‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी विन भारतात आला आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत आहे.  लंडनमध्ये चित्रपटाचा प्रचार केल्यानंतर काल दीपिका ‘एक्सएक्सएक्स’च्या  टीमसह भारतात परतली. ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सर्वप्रथम भारतात रिलीज होणार आहे. येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  अन्य देशांत तो १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.  



विन व दीपिका यांच्यासह डोनी येन, निना डोबे्रव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे हॉलिवूड स्टारही या चित्रपटात झळकणार आहेत. ‘एक्स एक्स एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सन २००२ मध्ये अलेल्या ‘एक्स एक्स एक्स’ आणि २००५ मध्ये आलेल्या ‘एक्स एक्स एक्स : स्टेट आॅफ द युनियन’चा सीक्वल आहे. 
  
 

Web Title: Ranveer at the XXX party, Deepika eyes all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.