​ रणवीरने सांगितले ‘पद्मावती’बद्दलचे सत्य!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 22:32 IST2016-08-22T17:02:44+5:302016-08-22T22:32:44+5:30

‘पद्मावती’वरून रणवीर सिंह आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील ताण-तणाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा ताण-तणाव अद्यापही संपण्याची चिन्हे ...

Ranveer tells the truth about 'Padmavati' !! | ​ रणवीरने सांगितले ‘पद्मावती’बद्दलचे सत्य!!

​ रणवीरने सांगितले ‘पद्मावती’बद्दलचे सत्य!!

द्मावती’वरून रणवीर सिंह आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील ताण-तणाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा ताण-तणाव अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत.  ‘पद्मावती’मध्ये रणवीर व दीपिका पादुकोण ही हॉट जोडी दिसणार, अशी सर्वात आधी बातमी आली. पण यानंतर अचानक रणवीर या चित्रपटातून आऊट झाल्याची खबर येऊन धडकली. रणवीरने  ‘पद्मावती’ची बाऊंड स्क्रीप्ट मागितल्याने भन्साळी संतापल्याचे कारण यासाठी दिले गेले. यासंदर्भात जेव्हा रणवीरला विचारले गले तेव्हा तोही विषय टाळतानाच दिसला. सध्या मी या चित्रपटाबद्दल काहीही बोलायच्या स्थितीत नाही. मला जसे काही कळेल, मी स्वत: सर्वात आधी मीडियाला याबाबत माहिती देईल, असे रणवीर म्हणाला. भन्साळींसोबतच्या संबंधांबद्दल विचारले असता. माझे व त्यांचे नाते अतिशय गोड आहे. त्यांचे स्माईलही अतिशय गोड आहे,असे रणवीर म्हणाला.

Web Title: Ranveer tells the truth about 'Padmavati' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.