पॅरिसच्या क्लबमध्ये दिसणार रणवीर सिंगचा ‘बेफ्रिके’ अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:56 IST2016-10-09T14:57:46+5:302016-10-17T14:56:29+5:30
पॅरिसच्या एका क्लबमध्ये रणवीर सिंगने ‘ब्रेफ्रि के’ अंदाजात जोरदार परफॉर्मन्स देणार असल्याचे वृत्त आहे. हे क्लब परदेशी कलाकारांच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या क्लबमध्ये अनेक दिग्गज कलावंतांनी आपले सादरीकरण केले आहे.
.jpg)
पॅरिसच्या क्लबमध्ये दिसणार रणवीर सिंगचा ‘बेफ्रिके’ अंदाज
आयफेल टावरहून प्रथमच एखाद्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी ‘ब्रेफ्रिके’च्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका वठविणारे सर्व कलावंत पॅरिसमध्ये हजर झाले आहेत. ट्रेलर लाँच कार्यक्रमानंतर रणवीर सिंग पॅरिसमधील जगप्रसिद्ध असलेल्या ऐव्हेन्यू देस चेम्प्सी-एलिसी मार्गावर असलेल्या लिओ कॅबिनेट क्लबमध्ये ‘बेफ्रिके स्टाईल’ नृत्य सादर करणार आहे. पॅरिसमधील हे क्लब परदेशी कलाकारांच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या क्लबमध्ये अनेक दिग्गज कलावंतांनी आपले सादरीकरण केले आहे. यात एल्टन जॉन, मर्लिन डायरिच, केस्लर ट्विंस, सिल्वी वार्टन, लॉरेल अॅण्ड हार्डी, शार्ली मॅकलेन यांचा सामवेश आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग या सादरीकरणासाठी उत्सुक असून त्याच्यासोबत डान्सर्सची एक चमू सादरीकरणात सहभागी असेल. रणवीरसह ब्ल्यूबेल गर्ल्स नाचताना दिसेल. मोठ्या कालावधीनंतर आदित्य चोपडा दिग्दर्शन करीत असल्याने आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतिच कसर राहू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. आदित्य चोप्राच्या मालकीची ‘वायआरएफ’यासाठी कोणतिच कसर ठेऊ इच्छित नाही असेच दिसते.
बेफ्रिकेच्या प्रमोशनासाठी पोहचलेल्या वाणी कपूरने इन्स्टाग्रामवर आपला फोटो अपलोड केला आहे.
">http://