रणवीर सिंगच्या जागी 'हा' अभिनेता करणार IPLमध्ये परफॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 10:19 IST2018-04-02T04:48:50+5:302018-04-02T10:19:32+5:30
IPL च्या ऑपनिंग सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूडचे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. ज्यात परफॉर्म करण्यासाठी रणवीर सिंगने आयोजकांनकडे मोठी रक्कम मागितली ...

रणवीर सिंगच्या जागी 'हा' अभिनेता करणार IPLमध्ये परफॉर्म
IPL च्या ऑपनिंग सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूडचे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. ज्यात परफॉर्म करण्यासाठी रणवीर सिंगने आयोजकांनकडे मोठी रक्कम मागितली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंग या सोहळ्याचा भाग बनणार नाही आहे. त्याच्या जागी बॉलिवूडमधला दुसरा अभिनेता परफॉर्म करणार आहे.
रणवीर सिंग सध्या गली बॉयच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ओव्हरस्ट्रेस पासून वाचण्यासाठी तो IPLच्या ओपनिंग सेरेमानीचा भाग बनणार नाही आहे. त्याची जागा आयोजक ह्रतिक रोशनशी बोलतायेत. अद्याप ह्रतिकने ही ऑफर स्वीकारली की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. 2015मध्ये कोलकात्तामध्ये IPL च्या ऑपनिंग सेरेमनीत ह्रतिकने परफॉर्म केले होते.
वरुण धवनने या कार्यक्रमाचा भाग बनण्यासाठी जवळपास 6 कोटींची रक्कम मागितली आहे.वरुणसह यात जॅकलिन फर्नांडिस आणि परिणीती चोप्रासुद्धा या कार्यक्रमाला चार चाँद लावण्याच्या तयारीत आहेत. वरुण धवन 'ब्रदीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा 2'मधील गाण्यावर परफॉर्म करणार आहे. कदाचित काही गाण्यावर जॅकलिनसुद्धा त्याच्यासोबत थिरकताना दिसणार आहे. सध्या वरुण धवन सुई धागाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. तर त्याचा अक्टूबर चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. येत्या १३ एप्रिलला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात वरूण एका हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल. या चित्रपटातून बनिता संधू बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.
ALSO READ : रणवीर सिंगवर का आली मुंबईत लोकलमध्ये जाण्याची वेळ ?