'बँड बाजा बारात'साठी रणवीर सिंग नाही तर हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:14 IST2018-03-20T07:44:45+5:302018-03-20T13:14:45+5:30

‘पद्मावत’चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने त्यात आपला जीव ओतला.  या भूमिकेसाठी त्याच्यावर कौतूकाचा वर्षावदेखील झाला. सध्या रणवीर ...

Ranveer Singh was not the band for 'Band Baaja Baraat', but the actor was the first choice for the producer | 'बँड बाजा बारात'साठी रणवीर सिंग नाही तर हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली चॉईस

'बँड बाजा बारात'साठी रणवीर सिंग नाही तर हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली चॉईस

द्मावत’चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने त्यात आपला जीव ओतला.  या भूमिकेसाठी त्याच्यावर कौतूकाचा वर्षावदेखील झाला. सध्या रणवीर गली बॉयच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  

रणवीरने आपल्या करिअरची सुरुवात यश राज बॅनरच्या बँड बाजा बारात या चित्रपटातून केली. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का बँड बाजा बारात चित्रपटातील भूमिका रणवीर सिंगच्या आधी रणबीर कपूर ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यांने ती नाकारल्यामुळे या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आले. रणवीर सिंगने ऑडिशन दिली आणि त्याची निवड झाली. या गोष्टीचा खुलासा खुद्द रणवीर सिंगने एका कार्यक्रमा दरम्यान केला आहे.   रणवीर पुढे म्हणाला की, पहिलाच चित्रपट यशराजचा मिळणं हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होते.  

ALSO READ :  प्रियंका चोपडाने चक्क मध्यरात्री केला रणवीर सिंगला व्हिडीओ कॉल!

काही दिवसांपूर्वी रणवीर एक जिमच्या बाहेर उभा होता. त्याठिकाणी त्याच्यासोबत सेल्फि काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. काही जण रणवीरसोबत अनेकदा सेल्फी घेताना वा व्हिडिओ काढताना  दिसले. हे पाहून रणवीर संतापला आणि त्याने अशांना अगदी धक्का देत बाजूला केले. एकाला तर रणवीर अगदी हात पकडून  बाजूला करत असल्याचे या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतेय.   
सध्या रणवीर जोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘गली बॉय’ मध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. या चित्रपटात आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. यानंतर तो रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'च्या तयारीला लागणार आहे. सिम्बानंतर रणवीर कबीर खानच्या  १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप टीमवर आधारित चित्रपटामध्ये व्यस्त होणार आहे एकूण काय तर आदित्य चोप्रा प्रमाणे रणवीर सिंगचे शूड्यूलही बिझी आहे. 

Web Title: Ranveer Singh was not the band for 'Band Baaja Baraat', but the actor was the first choice for the producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.