Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:49 PM2022-12-02T12:49:21+5:302022-12-02T12:49:29+5:30

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात.

ranveer-singh-special-video-for-siddharth-jadhav-for-his-marathi-film-balbharti | Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा

Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा

googlenewsNext

Siddharth Jadhav Ranveer Singh : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु रणवीर सिंग सोबत आगामी (Circus Movie) सर्कस या सिनेमात झळकणार आहे. तर सिद्धार्थ जाधवचा बालभारती हा मराठी सिनेमा आजच प्रदर्शित झाला आहे. आपल्या जिगरी दोस्तासाठी रणवीरने खास मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ जाधवने फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर सिंग म्हणतो, आताच मी बालभारती सिनेमाचा ट्रेलर बघितला. सिद्धु काय काय भारी अभिनेता आहेस, सुंदर माणूसही आहे, तु माझा फेव्हरेट आहेस. दादा आय लव्ह यु. आजपासून बालभारती संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय नक्की बघा.

यावर सिद्धु ने रणवीर सिंगचे आभार मानले आहेत. 'भावा...तु कमाल आहेस, मनापासून आभार दादा, दादा के जलवे, लव्ह यु यार असे म्हणले आहे.'

Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भुमिकेत आहे. तर इतरही अनेक कलाकार आहेत. त्यात आपला मराठमोळा सिद्धार्थ जाधव भाव खाऊन जाणार हे नक्की. सर्कस चे ट्रेलर आज रिलीज करण्यात येत आहे. 

Web Title: ranveer-singh-special-video-for-siddharth-jadhav-for-his-marathi-film-balbharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.