पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:00 IST2018-08-15T20:30:33+5:302018-08-15T21:00:00+5:30

'सिंबा'मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Ranveer Singh shares Simba behind the scene | पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

ठळक मुद्देरणवीर सिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत 'सिंबा' २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिंबा'ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सारा खानादेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू असून रणवीर सिंगने सेटवरील काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

रणवीर सिंगचे सेटवरील प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगली मैत्री झाली असून दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि तो अनेक वेळा सेटवर धम्माल करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा हे दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, यावेळी रणवीरने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. 'सिंबा' या चित्रपटामध्ये रणवीर एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील एका सीनचे चित्रीकरण सुरु असताना रणवीरने सेटवर सुरु असलेल्या पडद्यामागच्या दृश्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर काही गुंडासोबत मारामारी करत असून रोहित शेट्टी चित्रपटातील साहसी दृश्य कॅमेरामध्ये पाहत आहे. दरम्यान, शेअर झालेल्या या व्हिडिओवरुन चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. 



 

'सिंबा'मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' हा सिनेमा तेलगू चित्रपट टेंपरचा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग टेंपरमधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल. हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ranveer Singh shares Simba behind the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.