रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:00 IST2019-01-14T21:00:00+5:302019-01-14T21:00:00+5:30
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
'गली बॉय'च्या ट्रेलरमध्ये मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशा प्रकारे असते, याची कथा ट्रेलरमधून मांडली गेली आहे. यात रणवीरचा संघर्ष दाखवला असून परिस्थितीमुळे सहन करावे लागणारे धक्के आणि यातून रॅप साँगपर्यंतचा त्याचा प्रवास या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
#ApnaTimeAayega OUT NOW ! 🎵🔝🎤 https://t.co/FLQsugjgoo@ritesh_sid#ZoyaAkhtar@FarOutAkhtar@excelmovies#TigerBaby@aliaa08@SiddhantChturvD@kalkikanmani@ZeeMusicCompany@VivianDivine@ankurtewari@dubsharma#GullyBoy
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 14, 2019
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. या चित्रपटासाठी रणवीर रॅपचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटाला शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.