विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:36 PM2019-03-08T17:36:37+5:302019-03-08T17:39:32+5:30

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.

Ranveer Singh to portray Wing Commander Abhinandan Varthaman on silver screen? | विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे रणवीर सिंगने या चित्रपटात अभिनंदन यांची भूमिका साकारावी अशी इच्छा नेटिझन्सची असून त्यांनी यासाठी अनेक ट्वीट देखील केले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकवर बनलेला ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रचंड गाजला. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचेही प्रचंड कौतुक झाले. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर २७ फेब्रुवारीला भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी कोसळले आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. पण या हवाई झटापटीत दुर्दैवाने वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले असले तरी त्यांना पकडल्यानंतर वर्धमान यांनी दाखविलेले धैर्य, युद्धकैदी झाल्यानंतरही त्यांच्या देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास याचा जगावर प्रभाव पडला आणि अभिनंदन जिवंत भारतात परत आले यातच देशवासियांना आनंद झाला. 

अभिनंदन यांच्या याच शौर्य गाथेवर चित्रपट बनवला जावा अशी बॉलिवूडच्या मंडळींसोबतच सामान्य लोकांची देखील इच्छा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करत आहेत. एवढेच नव्हे तर रणवीर सिंगने या चित्रपटात अभिनंदन यांची भूमिका साकारावी अशी इच्छा नेटिझन्सची असून त्यांनी यासाठी अनेक ट्वीट देखील केले आहेत. रणवीर सिंग आता त्याच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करतो की नाही हे आपल्याला लवकरच कळेल.

रणवीर सिंग लवकरच 83 या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो सध्या व्यग्र आहे.

Web Title: Ranveer Singh to portray Wing Commander Abhinandan Varthaman on silver screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.