याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 10:44 IST2020-12-25T10:43:16+5:302020-12-25T10:44:48+5:30
होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. सध्याही रणवीरचा एक अतरंगी लूक चर्चेत आहे.

याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’
रणवीर सिंग बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक हिरो आहे, यात वाद नाही. मात्र त्याची अंतरंगी स्टाईल म्हणजे, कळस आहे. होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. सध्याही रणवीरचा एक अतरंगी लूक चर्चेत आहे आणि यावरून नेटकरी त्याची चांगलीच मजा घेत आहेत.
नुकताच रणवीर त्याच्या कझनसोबत दिसला. यावेळी त्याच्या कलरफुल कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओत तो एका मुलीसोबत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भयानी याने त्याच्या आॅफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर झाला आणि ताबडतोब व्हायरल झाला. मग काय फॅन्स सैराट झालेत.
लेडी गागालाही रणवीरला पाहून हेवा वाटावा. रणवीर माझ्यापेक्षा अधिक सनकी कसा? असा प्रश्न तिला पडत असेन, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही त्याची फिरकी घेतली. माझ्या 3 वर्षाच्या भाचीकडे असेच पिंक सनग्लॉसेस आहेत. रणवीरने हुबेहुब तसेच पिंक सनग्लासेस घातलेत, असे या युजरने लिहिले.
अलीकडे रणवीरने एक फोटो पोस्ट केला होता. यात त्याने व्हाईट टी-शर्टसोबत मोत्यांची माळ आणि कानात डायमंड स्टड घातले होते. तेव्हाही तो असाच ट्रोलझाला होता. रणवीरच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधले होते.
हा हार दीपिकाचा आहे का? असा सवाल एका चाहत्याने केला होता. अभिनेता अर्जुन कपूरने यावरून रणवीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.‘बाबा तू हिरा नाही मोती आहेस,’ असे त्याने लिहिले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर रणवीर स्पोर्ट्स ड्रामा ‘83’ रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. यात तो कपिल देवची भूमिका साकारणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमातही त्याची वर्णी लागली आहे.