दीपिका पादुकोणपासून दूर पळतोय रणवीर सिंह; हे आहे खरे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 11:56 IST2017-03-27T06:22:16+5:302017-03-27T11:56:17+5:30
दीपिका पादुकोण अलीकडे एका इव्हेंटमध्ये दिसली. ब्लॅक ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या दीपिकाला पाहून अनेकजण घायाळ झालेत. या इव्हेंटमध्ये दीपिका ...

दीपिका पादुकोणपासून दूर पळतोय रणवीर सिंह; हे आहे खरे कारण!!
द पिका पादुकोण अलीकडे एका इव्हेंटमध्ये दिसली. ब्लॅक ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या दीपिकाला पाहून अनेकजण घायाळ झालेत. या इव्हेंटमध्ये दीपिका धम्माल मस्ती करताना दिसली. खरे तर या इव्हेंटमध्ये दीपिकावर जीवापाड प्रेम करणारा तिचा बॉयफे्रन्ड(आत्ता आहे की नाही, दाव्यानिशी सांगता येणार नाही) रणवीर सिंह हा सुद्धा हजेरी लावणार होता. पण त्याने जाणीवपूर्वक हा इव्हेंट मिस केला. का माहितीय? कारण दीपिका या इव्हेंटमध्ये होती म्हणून. मध्यंतरी दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यामुळे रणवीर आता दीपिकाला टाळू लागलाय की काय? अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिक आहे. पण इथे कारण प्रेम किंवा प्रेमभंग नसून दुसरेच आहे. होय, हे कारण आहे संजय लीला भन्साळी. होय, ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सल्लयामुळे रणवीरने या इव्हेंटला जाणे टाळले. तेही त्या इव्हेंटमध्ये दीपिका होती म्हणून. आता यामागे नेमकी काय गोम आहे, हेही कळायलाच हवे. तर तेच आम्ही सांगतोय. ‘पद्मावती’ रिलीज होईपर्यंत एकमेकांपासून दूर राहायचे, असे भन्साळींनी दीपिका व रणवीरला स्पष्टपणे बजावले आहे. म्हणजे, कुठल्याही इव्हेंटमध्ये एकत्र दिसणे वा फोटोग्राफर्सला एकत्र पोझ देणे टाळायचे,असा त्याचा अर्थ. आता यामागचे कारण भन्साळींनाच ठाऊक़.
ALSO READ : दीपिका पादुकोण म्हणते, रोमान्ससाठी माझ्याकडे वेळ नाही
‘एक्सएक्सएक्स’च्या पार्टीत रणवीर-दीपिकावर खिळल्या सर्वांच्या नजरा!
अलीकडच्या काळात दीपिकाच्या ‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ झेंडर केज’च्या भारतातील प्रीमिअरला रणवीर व डिपी शेवटचे एकत्र दिसले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याच यायला लागल्या. आता या बे्रकअपच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कदाचित यामागेही काही प्लान असावा, कोण जाणो?