आईच्या बर्थ डे पार्टीत रणवीर सिंगचा ‘बेफिक्रे’ डान्स, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:17 IST2021-08-24T15:11:34+5:302021-08-24T15:17:21+5:30
शर्टलेस होत रणवीरने केला आईसोबत डान्स, ‘खलीबली’गाण्यावर वडिलांसोबतही थिरकला

आईच्या बर्थ डे पार्टीत रणवीर सिंगचा ‘बेफिक्रे’ डान्स, पाहा व्हिडीओ
रणवीर सिंग (Ranveer Singh ) म्हणजे, बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक हिरो. त्याचा सळसळता उत्साह अनेकप्रसंगी दिसतो तो म्हणूनच. तूर्तास त्याचे असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. निमित्त होते आईच्या वाढदिवसाचे. मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलात नुकतीच रणवीरच्या आईच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. आता पार्टी म्हटल्यावर रणवीर शांत कसा बसणार? त्याने अगदी धम्माल केली. त्याचे याच पार्टीचे धम्माल व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.व्हिडीओत रणवीर काऊ बॉय लूकमध्ये दिसतोय.
रविवारी रणवीरचे संपूर्ण कुटुंब या पार्टीसाठी एकत्र झालं. रक्षाबंधनासह आईच्या वाढदिवसही दणक्यात साजरा झाला. या पार्टीत रणवीर आईसोबत थिरकताना दिसला. ‘दिल चोरी साड्डा’ गाण्यावर त्याने जबरदस्त डान्स केला. अन्य एका व्हिडीओत रणवीर अगदी बेधुंद होऊन पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर डान्स करताना दिसत आहे.
वडिलांसोबतही ‘खलीबली’गाण्यावर तो डान्स करताना दिसला. एकंदर काय तर रणवीरनं पार्टीत धम्माल मज्जा केली. रेस्टॉरंटबाहेर पापाराझींना पोज देताना आईसाठी ‘बार बार दिन ये आए’ हे गाणं गातानाही तो दिसला.
रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा बनून तयार आहे. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. याशिवाय सर्कस, रॉकी और रानी की प्रेम कहानी, तख्त या सिनेमातही रणवीरची वर्णी लागली आहे.