रणवीर सिंगची ‘रईसी’,  इतक्या लाखांचे तर नुसते जोडे; वाचून डोळे पांढरे होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:48 AM2021-07-06T10:48:33+5:302021-07-06T10:50:00+5:30

Ranveer Singh Birthday बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (6 जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली.

ranveer singh birthday his net worth assets fees income property | रणवीर सिंगची ‘रईसी’,  इतक्या लाखांचे तर नुसते जोडे; वाचून डोळे पांढरे होतील

रणवीर सिंगची ‘रईसी’,  इतक्या लाखांचे तर नुसते जोडे; वाचून डोळे पांढरे होतील

googlenewsNext
ठळक मुद्देआदित्य चोप्राने रणवीरला पहिला ब्रेक दिला. २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’मध्ये रणवीरची वर्णी लागली. हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि रणवीर स्टार झाला. आज रणवीरकडे पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर सर्व काही आहे.

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा आज (6 जुलै) वाढदिवस.  (Ranveer Singh Birthday ) रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली.
तुम्हाला माहित नसेल पण रणवीरचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर त्याने भवनानी हे आडनाव आपल्या नावातून गाळले. खरे तर रणवीरला आपले रणवीर हे नावही बदलायचे होते. कारण त्याच्या व रणबीरच्या नावात बरेच साम्य वाटते. पण का कुणास ठाऊक नंतर रणवीरने आपला हा इरादा बदलला.

रणवीर सिंगचे बॉलिवूडशी कनेक्शन नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. होय, कारण रणवीर अनिल कपूरचा नातेवाईक आहे. रणवीरचे वडिल आणि अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर हे चुलत भाऊ-बहीण आहेत. अर्थात तरिही रणवीरला चित्रपटात येण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. शिवाय दीर्घ प्रतीक्षा करावी लागली.

तसा बॉलिवूडमध्ये येण्याचा रणवीरचा विचार नव्हता. खरे तर त्याला कंटेंट राईटर बनायचे होते. यासाठी अमेरिकेत तो शिकायलाही गेला. पण याठिकाणी पहिल्याच क्लासमध्ये रणवीरने ‘दीवार’चा डायलॉग बोलून दाखवला आणि त्यावेळी त्याचे प्रचंड कौतुक झाले. मुळात या एका घटनेनंतरच रणवीरने हिरो बनण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून भारतात परतल्यावर त्याला ३ वर्षे संघर्ष करावा लागला. या काळात एका जाहिरात कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. पण त्याला अभिनयात रस होता आणि हेच करायचे होते.

यानंतर रणवीरने थिएटरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पण याठिकाणी त्याला पडद्यामागचे काम सोपवले गेले, कलाकारांना चहा वाटणे, खुर्च्या लावणे, तालमीची तयारी करणे, अशी कामे त्याला करावी लागलीत. पण रणवीरने धीर सोडला नाही.
आदित्य चोप्राने रणवीरला पहिला ब्रेक दिला. २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’मध्ये रणवीरची वर्णी लागली. हा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि रणवीर स्टार झाला. आज रणवीरकडे पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर सर्व काही आहे.

caknowledge.com रिपोर्टनुसार, रणवीरकडे 223 कोटींची संपत्ती आहे. तो दर महिन्याला 2 कोटींपेक्षा अधिक कमावतो. म्हणजे वर्षालस 21 कोटींपेक्षा अधिक त्याची कमाई आहे.  रणवीरकडे 1000 पेक्षा जास्त जोडे आहेत. त्याची किंमत 68 लाख रूपये आहे. एका सिनेमासाठी रणवीर सुमारे 20 कोटी रूपये घेतो. शिवाय ब्रँड इंडोर्समेंटमधून तो बक्कळ कमाई करतो.

रणवीर महागड्या व अलिशान गाड्यांमधून फिरतो. त्याच्याकडे Aston Martin Rapid S, Mercedes Benz GLS, Jaguar XJ L, Lamborghini Urus, Ferrari अशा गाड्या आहेत. याची एकूण किंमत 14 कोटींच्या जवळपास आहे.

Web Title: ranveer singh birthday his net worth assets fees income property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.