रणवीर सिंग बनला ‘एक दिन का पोलिसावाला’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 17:41 IST2017-01-09T17:41:17+5:302017-01-09T17:41:17+5:30
बॉलीवूड कलाकार केवळ ग्लॅमरमध्ये रमतात असे नाही. काही संवेदनशील सेलिब्रेटी त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग समाजात चांगला संदेश देण्यासाठीदेखील करतात. अशा ...

रणवीर सिंग बनला ‘एक दिन का पोलिसावाला’
ब लीवूड कलाकार केवळ ग्लॅमरमध्ये रमतात असे नाही. काही संवेदनशील सेलिब्रेटी त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग समाजात चांगला संदेश देण्यासाठीदेखील करतात. अशा सेलिब्रेटींमध्ये रणवीर सिंग हे नाव आघाडीवर आहे. नुकतेच तो ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे आयोजित ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ या मोहिमेत सहभाग झाला होता.
यावेळी त्याने एका मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन केले. गाडी चालवत असताना सुरक्षेकडे कानाडोळा करून चालणार नाही. सर्वांनी हेल्मेट वापरणे व वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश यावेळी त्याने दिला. विशेष म्हणजे रॅली दरम्यान एका मोटारसायकलवर डबल सीट जाणाऱ्या चालकाला त्याने थांबवून मागे बसलेल्या व्यक्तीलासुद्धा हेल्मेट घालण्याचा आग्रह केला. अन्यथा त्याला रॅलीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे सांगतले.
कार्यक्रमाअंती त्याने सर्व पोलिसांसोबत ‘मल्हारी’ आणि इतर सुपरहीट गाण्यांवर डान्ससुद्ध केला. ‘ट्रॅफिकचे नियम तोडणे ही ‘कूल’ गोष्ट नाही’ असे त्याने आवर्जुन सांगितले. यावेळी त्याचे वडील जगजीत सिंग भवनानी त्याच्यासोबत होते. सुमारे तीन तास रणवीरने या अभियनासाठी दिले. शेवटी त्याने वडिलांना सोबत घेऊन चाहत्यांसोबत सेल्फीज् काढल्या.
ठाण्यामध्ये होणाऱ्या या ‘रस्ता सुरक्षा आठवड्या’चे हे २८ वे वर्ष आहे. यंदा ९ ते २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या अभियामध्ये अमिताभ बच्चनदेखील सहभागी झाले होते. सीसीटीव्ही निरीक्षण कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांनी वाहतूक व्यवस्थेचे डिजिटायजेशन याविषयी बोलताना ई-चलानाचे महत्त्व विशद केले.
cnxoldfiles/a> चित्रपटाची शूटींग करीत असून तो अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. यामध्ये दीपिका पदुकोन आणि शाहीद कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘बेफिक्रे’ मोठ्या पडद्यावर काही विशेष कामगिरी करू शकला नाही.