आलिया भटवर फिदा झाला रणवीर सिंग, या गोष्टीमुळे झाला इम्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 17:26 IST2019-01-05T17:08:08+5:302019-01-05T17:26:10+5:30
रणवीर सिंग आणि आलिया भट पहिल्यांदाच गली बॉय सिनेमातून एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. याआधी दोघांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहेत.

आलिया भटवर फिदा झाला रणवीर सिंग, या गोष्टीमुळे झाला इम्प्रेस
रणवीर सिंग आणि आलिया भट पहिल्यांदाच गली बॉय सिनेमातून एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. याआधी दोघांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहेत. मात्र सिनेमात एकत्र काम करण्याची दोघांची पहिलीच वेळ आहे. सध्या रणवीर आलियाची स्तुती करताना थकत नाहीय.
नुकताच रणवीरने आईएएनस दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ''गली बॉयमध्ये काम करण्याआधी मी आलियासोबत जाहिरातींमध्ये काम केले होते त्या खूप कॉमेडी होत्या. आलिया एक जबरदस्त एनर्जेटिक अभिनेत्री आहे. गली बॉयमध्ये काम करताना मला अनुभव आला की ती प्रतिभाशाली अभिनेत्री आहे.'' रणवीर पुढे म्हणाला,'' ती खूप एक्सप्रेसिव्ह आणि इमोशन्सने भरलेली आहे आणि तिच्या या गोष्टी मला खूप आवडल्या.''
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. टीजरमध्ये त्याची ही मेहनत स्पष्ट दिसतेय. केवळ रणवीरचं नाही तर टीजरमध्ये आलिया भट्ट व कल्की कोच्लिनची झलकही पाहायला मिळतेय. झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर, आलिया व कल्की या दमदार स्टार्सनी अगदी जीव ओतलाय, हे स्पष्ट आहे.येत्या ९ जानेवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. रणवीर आणि आलिया दोघांचे फॅन्स या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत.