रणवीर सिंग आणि कबीर खानच्या जोडीचा हा चित्रपट होणार या तारखेला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 10:49 IST2017-11-06T05:19:14+5:302017-11-06T10:49:14+5:30

दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता रणवीर सिंग मिळून एक चित्रपट करत आहेत. ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही पण ...

Ranveer Singh and Kabir Khan will release this film on this date | रणवीर सिंग आणि कबीर खानच्या जोडीचा हा चित्रपट होणार या तारखेला रिलीज

रणवीर सिंग आणि कबीर खानच्या जोडीचा हा चित्रपट होणार या तारखेला रिलीज

ग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता रणवीर सिंग मिळून एक चित्रपट करत आहेत. ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही पण हा चित्रपट १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. हा चित्रपटाला बायोपिक म्हणण्यात हरकत नाही कारण या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ह्या चित्रपटाशी निगडित एक मोठी बातमी हाती आली आहे ती म्हणजे ह्या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख निश्चित झाली आहे,  ५ एप्रिल २०१९ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
सध्या ह्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे शूटिंग २०१८ च्या मधल्या काळात सुरू होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा रिलायन्स इंटरटेन्मेंटने केला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः रणवीर सिंग करणार आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक कबीर खानने जाहीर केले होते की रणवीर सिंग ला घेऊन तो १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप टीमवर आधरित चित्रपट तयार करत आहे. ह्या कार्यक्रमाला  मोहिंदर अमरनाथ, श्रीकांत, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर ह्यासारखे वर्ल्ड कप विजेता संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होते. यासर्वानी रणवीर सिंग आणि कबीर खानचे कौतुक करत त्यांच्या ह्या चित्रपटासाठी अभिनंदन केले होते.  त्यांनी यावेळी हे ही आश्वासन दिले की या चित्रपटासाठी ते फक्त रणवीर आणि कबीरला नाही तर या चित्रपटातील सर्व कलाकारांना मार्गदर्शन करतील. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजला १८१ धावांनी पराभूत करीत वर्ल्डकप जिंकला होता. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक होता. 

यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्यामुळे रणवीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे.

ALSO READ :  SEE PICS : ​ दीपिका पादुकोणच्या पार्टीत सर्वात आधी पोहोचला रणवीर सिंग!

Web Title: Ranveer Singh and Kabir Khan will release this film on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.