रणवीर-दीपिकाचा व्हॅलेंटाईन डे झाला स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 03:13 IST2016-02-16T10:13:24+5:302016-02-16T03:13:24+5:30
‘बाजीराव मस्तानी’तील मस्तानी दीपिका पदुकोन सध्या टोरांटोत हॉलिवूडच्या ‘-3 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण, म्हणून तिचा व्हॅलेंटाईन डे काही ...

रणवीर-दीपिकाचा व्हॅलेंटाईन डे झाला स्पेशल
‘बाजीराव मस्तानी’तील मस्तानी दीपिका पदुकोन सध्या टोरांटोत हॉलिवूडच्या ‘-3 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण, म्हणून तिचा व्हॅलेंटाईन डे काही मिस झाला नाही. तिचा खास रणवीर सिंह व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी थेट टोरांटोत पोहोचला. जीवलग मैत्रिणीसाठी टोरांटोत आलेल्या रणवीरचा दीपिकासमवेतचा फोटो -3 चा दिग्दर्शक डीजे कारोसो याने टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. त्याखाली ‘सेटवरील आजचा खास पाहुणा रणवीर आनंदी, हसरी दीपिका’ असे कॅप्शनही दिले आहे. -3 हा दीपिकाचा बहुचर्चित हॉलिवूड चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तर, रणवीरचा ‘बेफिकीरे’ लवकरच येत आहे.