Ranveer-Deepika Wedding: रणवीर सिंगला लागली हळद...पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 10:25 AM2018-11-05T10:25:02+5:302018-11-05T10:29:50+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. दोघांच्याही घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. काल-परवा दीपिकाच्या बेंगळुरूस्थित घरी नंदी पूजा घातली गेली. यानंतर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. दोघांच्याही घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. काल-परवा दीपिकाच्या बेंगळुरूस्थित घरी नंदी पूजा घातली गेली. यानंतर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रणवीरचे अतिशय जवळचे मित्र-मैत्रिणी हजर होते. रणवीरची अतिशय जवळची मैत्रिण आणि यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा ही सुद्धा यावेळी हजर होती. शानू शर्मा हिनेच रणवीरला तिचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बारात’मध्ये कास्ट केले होते.
या हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत रणवीरच्या गालांवर हळद लागलेली दिसतेय. तो सेल्फी घेताना दिसतोय. फोटोत रणवीरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. यावेळी त्याने पांढºया रंगाचा कुर्ता घातला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हळदीचा कार्यक्रम दोन तास चालला. यावेळी रणवीरने आपल्या नेहमीच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये डान्सही केला.
येत्या १४ व १५ तारखेला दीपिका व रणवीरचे लग्न होणार आहे. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.
दीपिका व रणवीर इटलीच्या लेक कोमो येथे लग्न करणार असे मानले जात आहे, अर्थात अद्याप याबाबतची घोषणा झालेली नाही. या ड्रिम वेडिंगमध्ये केवळ ३० खास पाुहण्यांना बोलवण्यात आले आहे.
ताजी चर्चा खरी मानाल तर हे लग्न कलर कॉर्डिनेटेड असेल. म्हणजेच या लग्नात केवळ कुटुंबीयांनाच नाही तर वेटरला सुद्धा ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. या लग्नासाठी शेफसोबतही एक लेखी करार करण्यात आला आहे. त्यानुसार, या लग्नात जी पक्वाने असतील ती अन्य कुठेही कधीही बनवली जाणार नाही. साहजिकच या लग्नातील डिशेस अतियश खास असतील.
तामिळ आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा होणार असल्याचेही कळतेय.