Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 15:04 IST2019-02-06T15:03:37+5:302019-02-06T15:04:07+5:30
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!!
ठळक मुद्दे‘गली बॉय’ या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमो येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अगदी प्रमोशनल इव्हेंटमध्येही दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलतात. कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्येही हेच झाले. रणवीर दीपिकाबद्दल भरभरून बोलला. केवळ बोलला नाही तर दीपिकाला व्हिडिओ कॉल लावून तिच्यावर फ्लार्इंग किसची ‘बरसात’ करताना दिसला.
रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर व आलिया भट्ट ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचले. मग काय, दीपिकावरून कपिलची मज्जा घेण्यासोबतचं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना तो दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. एकीकडे आलिया व कपिल दोघेही एन्जॉय करताहेत. दुसरीकडे रणवीर दीपिकासोबत व्हिडीओ कॉलवर बिझी दिसतोय आणि दीपिकासोबत बोलणे संपल्यावर ‘ये आपकी भाभी थी’ असे सगळ्यांना सांगतोय.
‘द कपिल शर्मा शो’चा हा एपिसोड येत्या शनिवारी प्रसारित होतोय. तूर्तास त्याची एक झलक पाहाच...
‘गली बॉय’ या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.