रणवीर-अर्जुनला करायचाय ‘दोस्ताना 2’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:21 IST2016-10-12T10:24:19+5:302016-10-17T13:21:01+5:30
2008 मध्ये प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांचा ‘दोस्ताना’ चित्रपट आठवतोय का? कसा विसरणार म्हणा एवढा चांगला ...

रणवीर-अर्जुनला करायचाय ‘दोस्ताना 2’?
2008 मध्ये प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांचा ‘दोस्ताना’ चित्रपट आठवतोय का? कसा विसरणार म्हणा एवढा चांगला चित्रपट..‘दोस्ताना’ आला तेव्हापासूनच चाहते सिक्वेलची वाट पाहत होते. आता लवकरच ‘दोस्ताना 2’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
यात ‘बेफिक्रे’ स्टार रणवीर सिंग आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ स्टार अर्जुन कपूर ब्रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. ‘बेफि क्रे’ च्या ट्रेलर लाँच सोहळ्यावेळी रणवीरने सांगितले की,‘ मी ‘दोस्ताना 2’ करायला तयार आहे तेव्हाच जेव्हा अर्जुन कपूर माझ्यासोबत काम करायला तयार असेल.
याअगोदर रणवीर-अर्जुन यांनी ‘गुंडे’ मध्येही एकत्र काम केलेय. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत काम करणं काही फार कठीण जाणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्यालाही त्या दोघांना एकत्र पाहायला बेहद आवडते.