पैसा जाताच लेकीचीही माया आटली, राणू मंडलच्या पोरीनं आईला पुन्हा वाऱ्यावर सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:43 AM2021-09-13T11:43:03+5:302021-09-13T11:49:03+5:30

कोरोना काळात तर राणूला दोन वेळेच्या जेवणासाठीही कसरत करावी लागत होती. पुन्हा राणूला पूर्वीसारखेच आयुष्य जगावे लागत आहे.

Ranu Mandals daughter once again shows her true colors, when was famous came back & now again left her in her difficult times | पैसा जाताच लेकीचीही माया आटली, राणू मंडलच्या पोरीनं आईला पुन्हा वाऱ्यावर सोडलं

पैसा जाताच लेकीचीही माया आटली, राणू मंडलच्या पोरीनं आईला पुन्हा वाऱ्यावर सोडलं

googlenewsNext

राणू मंडल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे.  एक प्यार का नगमा हे गाणं गात राणू  मंडल स्टार बनली होती.  हिमेश रेशमियाने ब्रेक दिल्याने स्टार बनलेली राणूला  मिळालेले यश काही टिकवता आले नाही. एका रात्रीत स्टार बनलेली रानूचे आयुष्यच एका गाण्यामुळे पालटले होते. हलाखीच्या परिस्थितीत जगलेली राणूला आता चांगले दिवस आले होते. 

पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळ्याच गोष्टी तिला मिळायला सुरुवात झाली होती. राहते घर सोडून नवीन घरातही ती राहायला गेली होती. बॉलिवूडमध्ये गाण्याच्या संधी मिळत नसल्या तरीही अनेकदा टीव्ही रिएलिटी शोमध्ये तिला बोलवले जायचे.

शोमध्ये हजेरी लावणेसुद्धा तिच्या कमाईचे साधन बनले होते.  तिथेही कॅमरासमोररानूचा अंकार दिसायचा. इतकंच काय तर भेटायला येणाऱ्या चाहत्यांसह उद्धट वागणे,मीडिया मुलाखतीतमध्येही तिचे उद्धटच वागणे असायचे. या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा तिच्यावर भीक मागत गाणे गात गुजारण करण्याची वेळ आली. 

कोरोना काळात तर राणूला दोन वेळेच्या जेवणासाठीही कसरत करावी लागत होती. पुन्हा राणूला पूर्वीसारखेच आयुष्य जगावे लागत आहे. रानू स्टार बनली होती. तेव्हा मुलीनेही रानूला जवळ केले होते. तिच्यासोबतच राहत होती.चांगल्या दिवसांत मुलीनेही तिला साथ दिली.जसजशी राणूची आर्थिक स्थिती पुन्हा ढासळू लागली तेव्हापासून मुलीनेही राणूची साथ सोडल्याचे समोर आले आहे.

आता राणू पूर्वीप्रमाणे एकटीच राहत आहे.विशेष म्हणजे हिमेश रेशमियाने पुन्हा मदत करावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. कारण आपल्या गाण्यामुळे हिमेश रेशमियाने कोट्यावधी रु. कमावले असल्याचे रानू मंडलचे म्हणणे आहे. त्यामुळे या कठीण काळात पुन्हा हिमेशनेच मदत करावी असे तिने म्हटले आहे.  

अरेच्चा, रानू मंडलवरही बनणार बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

आता रानूवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा आहे. गेल्याच वर्षी सिनेमाची घोषणाही करण्यात आली होती. तसेच सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार यासाठीही अभिनेत्रीचा शोध सुरु होता.सिनेमाची कथा राणूच्या जीवनावर आधारीत असून ‘मिस राणू मारिया’ असं सिनेमाचे शिर्षक असणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऋषिकेश मंडल या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.रानूच्या भूमिकेत अभिनेत्री इशिका डे झळकणार आहे.

Web Title: Ranu Mandals daughter once again shows her true colors, when was famous came back & now again left her in her difficult times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.