वधूच्या गेटअपमध्ये दिसली रानू मंडल, नवीन व्हिडीओनं इंटरनेटवर घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 17:13 IST2022-04-14T17:13:18+5:302022-04-14T17:13:47+5:30
Ranu Mondal New Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र रानू मंडलने पुन्हा एकदा कच्च्या बदामाचे गाणे गाऊन इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

वधूच्या गेटअपमध्ये दिसली रानू मंडल, नवीन व्हिडीओनं इंटरनेटवर घातला धुमाकूळ
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र रानू मंडल(Ranu Mondal )ने पुन्हा एकदा कच्च्या बदामाचे गाणे गाऊन इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
इंटरनेट सेन्सेशन रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये ती वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहे. ती वधूचे कपडे घालून लग्न करत नाहीये, पण व्हायरल होण्याचा तिने नवा मार्ग शोधला आहे. फेसबुक आणि युट्यूबवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रानू मंडल लाल साडी आणि दागिन्यांमध्ये बंगाली वधूच्या रूपात दिसत आहे. तसेच, ती व्हायरल बंगाली गाणे 'कच्चा बदाम' गाताना दिसत आहे.
पश्चिम बंगालमधील भुबन बडियाकर या शेंगदाणे विक्रेत्याचे गाणे काही दिवसांपूर्वी ऑनलाइन ट्रेंड करत होते. याच गाण्याची नक्कल करत तिने 'कच्चा बदाम' हे गाणे आपल्या आवाजात गायले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रानू मंडल वधूच्या पेहरावात 'कच्चा बदाम' गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, या व्हिडिओने सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.