राणी मुखर्जीचा खुलासा, ‘या कारणामुळे आदित्य चोपडाशी केले लग्न’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 19:35 IST2018-04-03T14:05:38+5:302018-04-03T19:35:38+5:30

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत ३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली ...

Rani Mukherjee's disclosure, 'Aditya Chopda got married due to this reason'! | राणी मुखर्जीचा खुलासा, ‘या कारणामुळे आदित्य चोपडाशी केले लग्न’!

राणी मुखर्जीचा खुलासा, ‘या कारणामुळे आदित्य चोपडाशी केले लग्न’!

ही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत ३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तब्बल चार वर्षांनंतर कमबॅक करणारी राणी २०१४ मध्ये ‘मर्दानी’ या चित्रपटात एका दमदार पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. तुमच्या माहितीसाठी राणीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच तिने निर्माता तथा दिग्दर्शक आदित्य चोपडा याच्याशी एप्रिल २०१४ मध्ये लग्न केले होते. नुकतेच एका मुलाखतीत राणीने आदित्यसोबत लग्न का केले, याबाबतचा खुलासा केला आहे. 

आदित्य चोपडाबरोबर झालेल्या तिच्या पहिल्या भेटीबद्दलचा खुलासा राणीने या मुलाखतीत केला. तिने म्हटले की, आमची पहिली भेट एका रेस्टॉरेंटमध्ये झाली होती. हा तेव्हाचा काळ होता, जेव्हा मी केवळ एकाच चित्रपटात काम केले होते. तर आदित्यला डीडीएलजेच्या यशामुळे सर्वत्र ओळखले जाऊ लागले. आदित्यने मला बघून असा विचार केला की, ही मुलगी मला बघून माझ्याकडे येईल. परंतु मी तसे केले नाही. कदाचित हिच बाब आदित्यला चांगली वाटली असावी. पुढे त्याने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी माझ्या नावाची शिफारस केली. 



राणी मुखर्जीला पहिल्यांदा डेटवर घेऊन जाण्यासाठी आदित्य खूपच ट्रेडिशनल राहिला. आदित्य स्वत: राणीच्या घरी गेला होता. तसेच राणीला डेटवर घेऊन जाण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडे परवानगी मागितली. राणीने सांगितले की, आदित्यचा हाच स्वभाव माझ्या मनाला भावला. काही काळ एकमेकांना डेटिंग केल्यानंतर राणी आणि आदित्यने हा निर्णय घेतला होता की, त्यांच्यातील नात्याबद्दल ते जाहीर वाच्यता करणार नाहीत. 



राणीने सांगितले की, आम्हा दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ हवा होता. आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की, खरोखरच आम्ही दोघे एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करू शकणार काय? याविषयी राणी सांगतेय की, आदित्य आणि माझे विचार जुळणारे आहेत. आदित्य त्याच्या पालकांचा खूप आदर करतो. आम्ही दोघांनी मिळून एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेरीस मला हे कळून चुकले की, आदित्य माझ्यासाठी परफेक्ट आहे. या दोघांनी २०१४ मध्ये इटली येथे लग्न केले होते. या दाम्पत्याला आदिरा नावाची मुलगी आहे. 

Web Title: Rani Mukherjee's disclosure, 'Aditya Chopda got married due to this reason'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.