Exclusive : राणी मुखर्जीच्या फॅन्ससाठी खुषखबर, 'मर्दानी2'चे शूटिंग सुरू

By गीतांजली | Updated: March 26, 2019 13:22 IST2019-03-26T13:17:57+5:302019-03-26T13:22:57+5:30

राणी मुखर्जी ‘मर्दानी’चा सीक्वल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमाचे शूटिंग राणीने सोमवारपासून सुरु झाले आहे.

Rani Mukherjee started shooting of Mardaani 2 | Exclusive : राणी मुखर्जीच्या फॅन्ससाठी खुषखबर, 'मर्दानी2'चे शूटिंग सुरू

Exclusive : राणी मुखर्जीच्या फॅन्ससाठी खुषखबर, 'मर्दानी2'चे शूटिंग सुरू

ठळक मुद्देयात राणी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे

राणी मुखर्जी ‘मर्दानी’चा सीक्वल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमाचे शूटिंग राणीने सोमवारपासून (काल)  सुरु झाले आहे.  यात राणी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. २१ वर्षीय खलनायकाशी राणीचा सामना होताना दिसणार आहे. मर्दानी 2 चे शूटिंग राणीने मुबंईत सुरु केले आहे. 

दिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलची निर्मिती असणार आहे. २०१९ च्या अखेरिस हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असण्याची शक्यता आहे.  २०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला 'मर्दानी' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.

‘मर्दानी’ हा राणीचा आवडता सिनेमा असल्याचे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. हा रिलीज झाला तेव्हाच ‘मर्दानी 2’ कधी येणार, असे लोकांनी विचारणे सुरु केले होते.  याशिवाय राणी आणि अनिल कपूरच्या जोडीचा  'नायक - द रिअल हिरो' सिनेमाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु झाल्याचे कळतेय. 
 

Web Title: Rani Mukherjee started shooting of Mardaani 2