'मलांग'मध्ये जमणार राणी मुखर्जी आणि संजय दत्त जोडी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:29 IST2017-09-02T09:59:26+5:302017-09-02T15:29:26+5:30

संजय दत्तकडे चित्रपटांची काही कमी नाही आहे. एकानंतर एका त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक आरंभ कुमार ...

Rani Mukherjee and Sanjay Dutt pair in 'Malang' | 'मलांग'मध्ये जमणार राणी मुखर्जी आणि संजय दत्त जोडी ?

'मलांग'मध्ये जमणार राणी मुखर्जी आणि संजय दत्त जोडी ?

जय दत्तकडे चित्रपटांची काही कमी नाही आहे. एकानंतर एका त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक आरंभ कुमार आपला आगामी चित्रपट 'मलांग' मध्ये संजय दत्तला साईन केले आहे. एवढेच नाही तर संजय दत्तसोबत राणी मुखर्जी झळकणार असल्याची चर्चा आहे. अजूनही याचित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु आहे पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार या भूमिकेसाठी राणी मुखर्जी परफेक्ट असल्याचे समजते आहे. हा एक रोमाँटिक थ्रिलर चित्रपट असणार आहे. 

संजय दत्तपण राणी मुखर्जीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. पहिल्यांदाच संजय दत्त राणी मुखर्जीसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. यात संजय दत्त एका इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राणी मुखर्जी पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. संजूबाबा राणी मुखर्जीच्या कामाच्या पद्धतीवरुन खूपच प्रभावित झाला आहे. नुकतेच राणी मुखर्जीने यशराज बॅनरच्या तयार होणारा 'हिचकी' चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. काही वर्षांपासून राणी मुखर्जीने फक्त आपल्या पती आदित्य चोप्राच्या बॅनरचे चित्रपट साईन केले आहेत. त्यामुळे आता हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे की राणी यश राज बॅनरसोडून इतर चित्रपट साईन करणार की नाही.  
 
या चित्रपटाची शूटिंग यावर्षी डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग वाराणसी आणि शिमलामध्ये होणार आहे. मिड-डेला दिल्या गेलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान आरंभ सिंगने सांगितले की, ''त्याला मलांगसाठी अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीला साईन करण्याची इच्छा आहे. संजय दत्त आणि राणी मुखर्जी ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल.'' 

Web Title: Rani Mukherjee and Sanjay Dutt pair in 'Malang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.