Rangoon New Song Launch : ‘मेरे मियाँ गये इंग्लंड’ गाण्यातील कंगना राणौतचा फनी अंदाज पाहून तुम्ही पडाल प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 12:24 IST2017-01-27T05:44:33+5:302017-01-27T12:24:15+5:30
‘रंगून’ चित्रपटातील ‘मेरे मियाँ गये इंग्लंड’ हे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. शाहिद-कंगना-सैफ या तीन गुणी कलाकारांना एकत्र आणण्याचे काम दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केलेय. पाहूयात, या फनी गाण्याची एक झलक़..

Rangoon New Song Launch : ‘मेरे मियाँ गये इंग्लंड’ गाण्यातील कंगना राणौतचा फनी अंदाज पाहून तुम्ही पडाल प्रेमात!
१ ४९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पतंगा’ या चित्रपटातील ‘मेरे पिया गये रंगून...’ हे गाणे तुम्हाला आठवते ना? शमशाद बेगम आणि सी. रामचंद्र यांच्या आवाजातील आणि यांच्यावरच चित्रीत झालेल्या या गाण्यातील आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला चित्रपट ‘रंगून’ मध्येही या गाण्याशी साधर्म्य सांगणारे एक गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. ‘मेरे मियाँ गये इंग्लंड’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्यात कंगना राणौत अत्यंत मजेशीर आणि विनोदी प्रकारे दाखवण्यात आली आहे. गाणे म्हणण्याची स्टाईल, डान्स स्टेप्स या पूर्णपणे विनोदी अंगाने घेतल्या आहेत.
![]()
सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत यांच्या मुख्य भूमिकेतील ‘रंगून’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. एकामागोमाग एक असे ‘रंगून’ चित्रपटातील गाणी लाँच करण्यात येत आहेत. गायिका रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे नुकतेच लाँच करण्यात आलेले गाणे रसिकांना आवडणारच यात काही शंकाच नाही. यात कंगना भारतीय सैनिकांसमोर डान्स करून त्यांचे मनोरंजन करते आहे. गाण्यात अॅडॉल्फ हिटलरसारख्या जगातील काही लीडर्स आणि इतरांवर विनोद करण्यात येत आहेत. तसेच सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांना कंगना भेटतांनाचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ हा चित्रपट ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कास्टिंगपासून ते संगीतापर्यंत या चित्रपटात सर्वकाही अगदी वेगळं आणि युनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ‘मेरे मियाँ गये इंग्लंड या गाण्याचे शब्द गुलजार यांचे असून हे गाणे रेखा भारद्वाज यांनी गायले आहे. ‘ओपेरा संगीत’ हे चित्रपटाचे वैशिष्टय आहे. ‘ये ईश्क हैं’ या गाण्यानंतर रिलीज झालेले हे गाणे रसिकांना भुरळ घालणार हे नक्की!!!
ALSO READ :
* Ye Ishq Hai Song Launch : शाहिद कपूर-कंगना राणौत यांची Sizzling Chemistry
* ‘रंगून’चे पहिले गाणे रिलीज : ‘ब्लडी हेल’मध्ये कंगनाचा लुक हंटरवालीचा