अभिनेते रणधीर कपूर यांना आयसीयूमध्ये हलवले; म्हणाले, कोरोना कसा झाला कल्पना नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:46 PM2021-04-30T12:46:16+5:302021-04-30T12:46:41+5:30

Randhir Kapoor Health Update: घरात काम करणाऱ्या पाच स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण

randhir kapoor shifted to icu for some tests related to covid 19 | अभिनेते रणधीर कपूर यांना आयसीयूमध्ये हलवले; म्हणाले, कोरोना कसा झाला कल्पना नाही...

अभिनेते रणधीर कपूर यांना आयसीयूमध्ये हलवले; म्हणाले, कोरोना कसा झाला कल्पना नाही...

googlenewsNext
ठळक मुद्दे माझ्या दोन्ही मुली करिना व करिश्मा शिवाय पत्नी बबीता यांच्याही कोरोना टेस्ट केल्या गेल्यात. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

करिना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता 74 वर्षांच्या रणधीर यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
ई टाईम्ससोबत संवाद साधत खुद्द रणधीर यांनी हीमाहिती दिली आहे. (Randhir Kapoor Health Update)

काय म्हणाले रणधीर?
मला पुढच्या काही टेस्टसाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. रूग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफ सर्वजण शिवाय टीना अंबानी सुद्धा माझी खूप चांगली काळजी घेत आहेत. डॉक्टर्स सतत माझ्या अवतीभवती आहेत. सध्या तरी सर्व काही नियंत्रणात आहे, असे त्यांनी सांगितले.
मला कोरोना कसा झाला, माहित नाही़. मी स्वत: हैराण आहे. माझ्या पाच स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. मी त्यांनाही कोकिळाबेन रूग्णालयात दाखल केले आहे.
मी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले होते. यादरम्यान मला काहीसी कणकण जाणवली. सौम्य तापही होता. यामुळे मी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह येताच मला रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ताप नाही. कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत. ना श्वास घ्यायला त्रास होतोय, ना ऑक्सिजन वा आयसीयू सपोर्टची गरज भासतेय. माझ्या दोन्ही मुली करिना व करिश्मा शिवाय पत्नी बबीता यांच्याही कोरोना टेस्ट केल्या गेल्यात. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 
 

Web Title: randhir kapoor shifted to icu for some tests related to covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.