टॅक्सी चालवली, हॉटेलमध्ये केलं काम, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का याला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:38 IST2023-06-20T16:34:02+5:302023-06-20T16:38:56+5:30
फोटोत निरागस दिसणाऱ्या या मुलाने आज बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. या मुलाचे नाव इंडस्ट्रीतील टॉप स्टार्सच्या यादीत सामील आहे.

टॅक्सी चालवली, हॉटेलमध्ये केलं काम, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का याला?
अभिनयाच्या चमचमत्या दुनियेत नशीब आजमावायला कोट्यवधी लोक येतात. मात्र काहीच जण यात यशस्वी होतात. काही लोकांना संधी मिळाते पण स्वतःला या स्पर्धेत ठेवून ठेण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. फोटोत दिसणारा हा मुलगा यांपैकी एक आहे. मोठा संघर्ष केल्यानंतर या मुलाने बॉलिवूडच्या टॉप स्टार्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.
फोटोमध्ये दिसणार्या या मुलाने मेलबर्नमध्ये शिकत असताना खूप संघर्ष केला होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी या मुलाने आपल्या करिअरमध्ये टॅक्सी ड्रायव्हरपासून वेटरपर्यंत अनेक काम केली आहेत. इतकंच नाही तर लहानपणीच आई-वडिलांपासून विभक्त होण्याचं दु:खही त्याने सोसलं आहे. बालपण आजीसोबत गेले पण आयुष्यात कधीच निराश झाले नाही. त्यावेळी क्वचितच कोणी विचार केला असेल की हा मुलगा मोठा होऊन इंडस्ट्रीत एवढी प्रसिद्धी मिळवेल. तुम्ही आता या मुलाला ओळखले नसेल तर आम्ही सांगतो कोण आहे हा अभिनेता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून रणदीप हुड्डा आहे. हा फोटो रणदीपच्या बालपणीचा आहे. 'मान्सून वेडिंग'मधून या अभिनेत्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्याने 'जिस्म 2', 'किक', 'वन्स अपॉन अ टाइम', 'सरबजीत', 'कॉकटेल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. रणदीपने सरबजीत' चित्रपटात साकारलेली भूमिका लोकांच्या मनात आजही घर करून आहे.
रणदीप हुड्डा हा इंडस्ट्रीचा हँडसम हंक स्टार आहे. इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यापैकी सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे सुष्मिता सेन. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्याने नीतू चंद्रासोबत २-३ वर्षे डेट केले. याशिवाय त्याचे नाव आदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लिसा हेडनसोबतही जोडले गेले आहे. अलीकडेच हा अभिनेता 'इन्स्पेक्टर अविनाश' वेब सीरिजमध्येही दिसला होता. या वेब सीरिजमधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.