रणदीप हुड्डा होस्ट करणार ‘हा’ टीव्ही शो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 15:54 IST2017-02-06T10:24:02+5:302017-02-06T15:54:02+5:30
‘दी बिग एफ शो’चे दुसरे सीझन लवकरच येतेय. या शोचे पहिले सीझन ‘बिग बॉस वीनर’ गौतम गुल्हाटी होस्ट करताना ...

रणदीप हुड्डा होस्ट करणार ‘हा’ टीव्ही शो!
‘ ी बिग एफ शो’चे दुसरे सीझन लवकरच येतेय. या शोचे पहिले सीझन ‘बिग बॉस वीनर’ गौतम गुल्हाटी होस्ट करताना दिसला. आता दुसरे सीझन कोण होस्ट करणार? हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमच्याकडे फक्कड बातमी आहे. होय, ‘दी बिग एफ शो’चे दुसरे सीझन दुसरा कुणी नाही तर अभिनेता रणदीप हुड्डा होस्ट करणार आहे. होय, या शोद्वारे रणदीप टेलिव्हिजनवर डेब्यू करतोय.
‘दी बिग एफ शो’ हा शो समाजात निषिद्ध मानल्या गेलेल्या कल्पनांवर आधारित आहे. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमात पडलेल्या दोन मुलींची कहाणी दाखवली गेली होती. या कथेत दोन्ही मुलींमध्ये हॉट लिपलॉक सीन्स चित्रीत केला गेला होता. अशा बोल्ड विषयांवरील कथांमुळे हा शो फार कमी वेळात लोकप्रीय झाला. आता या शोच्या दुस-या सीझनमध्ये रिअल लाईफ स्टोरी दाखवण्यात येणार आहेत. समाजाची बंधने झुगारून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणा-या महिलांच्या कथा यात दिसणार आहे.
संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदीपचा मोठा चाहता वर्ग आहे. विशेषत: महिलांमध्ये रणदीप प्रचंड लोकप्रीय आहे. त्यामुळे हा शो होस्ट करण्यासाठी रणदीप अगदी योग्य व्यक्ती आहे, असे संबंधित चॅनलला वाटते. रणदीपलाही शोचा कन्सेप्ट प्रचंड आवडला आणि त्याने यास होकार दिला. लवकरच रणदीप याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण करणार आहे. यानंतर छोट्या पडद्यावरील आगमनासाठी रणदीप एकदम तयार असणार आहे.
येत्या मार्चमध्ये रणदीप हुड्डासोबत ‘दी बिग एफ शो’ आपण पाहू शकणार आहोत. तोपर्यंत तग धरणे सोपे नाही. पण शेवटी ‘सब्र का फल मीठा जो होता है...’!
ALSO READ: रणदीप हुड्डा शोधतोय ‘असली’ हीरो
पाहा : ‘बॅटल ऑफ सारागढी’तील रणदीपचा फर्स्ट लूक