"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:47 AM2024-04-03T11:47:06+5:302024-04-03T11:48:24+5:30

रणदीप हूडाने कंगना रणौतच्या एका कृतीवर उघड नाराजी व्यक्त केलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

randeep hooda from swatantryaveer savarkar movie angry on kangana ranaut target over alia bhatt | "अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

अभिनेता रणदीप हूडा सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणदीपने साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळत आहे. रणदीप सध्या विविध सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य करत असतो. अशातच रणदीपने अभिनेत्री कंगना रणौतबद्दल नाराजी व्यक्त केलीय. कंगनाच्या एका जुन्या विधानावर रणदीपने उघडपणे नाराजी दर्शवली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

रणदीपने एका मुलाखतीत कंगनाने आलिया भटबद्दल केलेल्या जुन्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. 'गली बॉय' सिनेमाच्या वेळी आलियाचा अभिनय पाहून कंगनाने तिच्यावर टीका केली होती. त्यावेळी रणदीपने त्याच्या 'हायवे' सिनेमातील सह-अभिनेत्रीला सपोर्ट केला होता. आता पुन्हा एकदा रणदीप म्हणाला, "आलियाला टार्गेट करणं अत्यंत चुकीचं होतं. आलिया त्या काळात सातत्याने नवनवीन गोष्टी करुन बघत होती."

रणदीप पुढे म्हणाला, "तुमच्या सहकलाकारांना किंवा तुमच्या सहकाऱ्यांना सातत्याने असं टार्गेट करणं चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अनेक गोष्टी मिळाल्या नाहीत. परंतु असं नाही, तुम्हाला अनेक गोष्टी या इंडस्ट्रीतून मिळाल्या असतात. त्यामुळे एखाद्याला टार्गेट करणं चुकीचं आहे. त्यावेळी मला वाटत होतं की आलियाला सपोर्ट करावा आणि मी तो केला." रणदीपची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा चांगलाच गाजतोय

Web Title: randeep hooda from swatantryaveer savarkar movie angry on kangana ranaut target over alia bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.