बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा; रणदीप हुड्डा म्हणाला, आता मला सवय झालीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:20 IST2021-04-27T12:19:55+5:302021-04-27T12:20:33+5:30
कदाचित त्यांना माझी अॅक्टिंग आवडली नसेल; रणदीप हुड्डाचा बॉलिवूडला टोमणा

बॉलिवूडकडून ना कौतुकाची थाप, ना चर्चा; रणदीप हुड्डा म्हणाला, आता मला सवय झालीये
अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) ‘एक्सट्रॅक्शन’ (Extraction) या हॉलिवूड सिनेमाची चर्चा खूप झाली. या सिनेमात रणदीपने हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. या सिनेमातील रणदीपच्या अभिनयाचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले. पण बॉलिवूडच्या सहकलाकारांच्या तोंडून मात्र कौतुकाचा एक शब्दही रणदीपला ऐकायला मिळाला नाही. आता रणदीपने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘एक्सट्रॅक्शन’ या सिनेमाकडे बॉलिवूडने पाठ फिरवली, सहकलाकारांनी या सिनेमाची साधी दखलही घेतली नाही. सहअभिनेत्याचे सिनेमे रिलीज झाल्यावर बॉलिवूड स्टार्स एकमेकांना शुभेच्छा देतात, टीजर-ट्रेलर शेअर करतात. चाहत्यांना सिनेमा पाहण्याचे आवाहन करतात. पण रणदीपच्या ‘एक्सट्रॅक्शन’बद्दल असे काहीही झाले नाही. त्याने स्वत: हे नोटीस केले. एका ताज्या मुलाखतीत तो यावर बोलला.
तो म्हणाला, ‘इंडस्ट्रीतील लोकांमध्ये सिनेमावरून चर्चा होतात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. पण माझ्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाबद्दल इंडस्ट्री कमालीची अनुत्सूक दिसली. आता तर मला या गोष्टीची सवय झाली आहे. कदाचित माझ्या सहकलाकारांना माझा अभिनय आवडला नसेल. म्हणून त्यांनी माझ्या या सिनेमावर बोलणे टाळणे असावे.’
‘एक्सट्रॅक्शन’ या सिनेमात रणदीपने मेजरची भूमिका साकारली होती. त्याचा हा सिनेमा अॅव्हेंजर्स- इन्फिनिटीर वॉर व ऐंडगेम फेम रूसो ब्रदर्सने प्रोड्यूस केला होता. ‘एक्सट्रॅक्शन’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाचे बहुतांश शूटींग भारतात झाले होते. नेटफ्लिक्सच्या इतिहासात ही सर्वाधिक पाहिली गेलेली ओरिजनल फिल्म आहे. याच्या सीक्वलवर सध्या काम सुरू आहे.