​‘असा’ असेल रणबीरचा जग्गा जासूस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 14:39 IST2016-12-18T13:33:12+5:302016-12-18T14:39:02+5:30

रणबीर कपूर आणि एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर मोठ्या पडद्यावर येणार असे दिसतेय. ...

Ranbir's Jagga Detective ... | ​‘असा’ असेल रणबीरचा जग्गा जासूस...

​‘असा’ असेल रणबीरचा जग्गा जासूस...

बीर कपूर आणि एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर मोठ्या पडद्यावर येणार असे दिसतेय. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यासाठी २० डिसेंबरचा मुहूर्त निवडला आहे.

अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूक एकदम हटके आणि आतापर्यंत कधीही न वापरलेल्या पद्धतीने लाँच करण्यात येणार आहे. चित्रपटातील प्रमुख पात्र जग्गा जासूसची ओळख आणि त्याच्या आयुष्यातील गंमतीजमती व अ‍ॅडव्हेंचर्स ‘वर्ल्ड आॅफ जग्गा जासूस’ अर्थात ‘जग्गा जासूसचे विश्व’ या स्पेशल फीचरद्वारे दाखवण्यात येणार आहे.

म्हणजे ट्रेलर किंवा टीझरऐवजी, काही तरी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करण्याची निर्मात्यांची योजना आहे. ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर कपूर आपल्याला एका तरुण गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून आपल्या वडिलांचा शोध तो घेत असतो. यामध्ये त्याच्यासोबत कॅट आणि अदा शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.

                                    
                                    जग्गा जासूस : रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा चित्रपट गेली अनेक वर्षे लांबणीवर पडला. शूटींग सुरू झाली तेव्हा प्रेमात पडलेले रणबीर-कॅट कालांतराने वेगळे झाले आणि त्याचा विपरित परिणाम चित्रपटावर झाला. शिवाय अनेक सीन्स पुन्हा चित्रित करण्यात आल्यामुळेसुद्धा सिनेमाला उशिरा झाला.

                                   
                                   केमिओ? : जग्गा जासूसच्या सेटवर चाहत्यासोबत फोटो काढताना शाहरुख खान.

सुत्रांनुसार, शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे. मध्यंतरी किंग खान चित्रपटाच्या सेटवरसुद्धा गेला होता. त्यामुळे या चर्चांना उधाण आले. याबाबत अद्याप तरी कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण असे जर झाले तर रणबीरच्या फिल्ममध्ये केमिओ करण्याची शाहरुखची ही दुसरी वेळ ठरेल.

याआधी त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याच्या पूर्व पतीची भूमिका केली होती. ‘बर्फी’नंतर अनुराग बसू आणि रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे.

Web Title: Ranbir's Jagga Detective ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.