रणबीर कपूरची लव्ह स्टोरी सुरु होण्याआधीच संपली, या प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाला डेट करतेय आलिया भट्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 12:33 IST2018-02-09T06:46:06+5:302018-02-09T12:33:21+5:30

आलिया भट्ट करण जोहरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगसाठी इस्राइलमध्ये आहे. यात ती रणबीर कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राशी ...

Ranbir Kapoor's love story just ended, Alia Bhatt is making a date for the famous industrialist's son! | रणबीर कपूरची लव्ह स्टोरी सुरु होण्याआधीच संपली, या प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाला डेट करतेय आलिया भट्ट !

रणबीर कपूरची लव्ह स्टोरी सुरु होण्याआधीच संपली, या प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाला डेट करतेय आलिया भट्ट !

िया भट्ट करण जोहरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगसाठी इस्राइलमध्ये आहे. यात ती रणबीर कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राशी ब्रेकअप झाल्यानंतर आलिया रणबीरच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. मात्र आतली खबर काही वेगळी आहे.  

आलिया आणि रणबीरच्या मध्ये तिसऱ्याची एंट्री झाली आहे. ज्यामुळे रणबीरचे मन तुटू शकते. मिडे-डेच्या रिपोर्टनुसार आलिया भट्ट रणबीर कपूरला नाही तर कैविन मित्तलला डेट करते आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा कैविन मित्तल. 

कैविन मित्तल हा प्रसिद्ध उद्योगपती सुनील मित्तल यांचा मुलगा आहे. तसेच तो हाईक मैसेंजर या अॅपचा फाऊंडरदेखील आहे. आलिया आणि कैविनची पहिली ओळख ऑक्टोबर 2017मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरम दरम्यान झाली होती. यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि दोघे एकमेकांना आवडू लागले. आलियाला जेव्हा ही मदतची गरज असते कैविन सगळ्यात आधी हजर असतो. या मैत्रिचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे आलियाला ही कळले नाही. सध्या दोघांनाही त्यांचे प्रेम जगासमोर आणायचे नाही आहे. तर दुसरीकडे रणबीर आणि आलियाच्या अफेरच्या चर्चेंजेखील जोर पकडला आहे.  

रणबीर कपूर त्याच्या आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चेमुळे खूप नाराज आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण जोहर आपल्या चित्रपटाला हिट करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहे. यामुळे रणबीर नाराज आहे. यावरुन त्यांने करण जोहराल सुनावल्याचे समजते. 

ALSO READ :   दीड महिन्यानंतर आलिया भट्टने अनुष्का शर्माला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ!

'ब्रह्मास्त्र'  चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत.  या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. यात  एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत.

Web Title: Ranbir Kapoor's love story just ended, Alia Bhatt is making a date for the famous industrialist's son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.